“तु मला आवडतेस … ” महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा विनयभंग
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | “तु मला खूप आवडतेस… मला तुझा नंबर दे… ” असे म्हणत शासकीय रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याची घटना दि. २ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथील सरकारी रुग्णालयात घडली. याप्रकरणी संशयित गोपाळ पाटील यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील नशिराबाद येथील सरकारी दवाखान्यात महिला वैद्यकीय अधिकारी नियक्तीस असून याच गावातील गोपाळ धनराज पाटील उर्फ करोडपती हा व्यक्ती त्या महिला अधिकाऱ्याच्या टेबलाजवळ जाऊन त्याने “तू माझी आहेस, तुझा नंबर मला दे व माझा नंबर घे, माझ्यासोबत बोल असे म्हणाला”. तसेच यापुर्वी देखील तो त्या महिला अधिकाऱ्याच्या पाठलाग करुन “तु मला आवडतेस” असे म्हणून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन त्यांचा विनयभंग केला.
या त्रासाला कंटाळून अखेर त्या महिला डॉक्टरने नशिराबाद पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यानुसार गोपाळ धनराज पाटील याच्या विरुद्ध नशिराबाद पोलीस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोहेकॉ अतुल महाजन हे पुढील तपास करीत आहेत.