भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

आ. गिरीश महाजनांवर मोक्का लावत, फडणवीस-महाजनांना अटक करण्याची तयारी झाली होती, त्या योजनेचा मी साक्षीदार; मुख्यमंत्री शिंदे

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा |महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी भाजप नेते गिरीश महाजन यांना अटक करण्याच्या योजनेचा मी साक्षीदार असून आ. गिरीश महाजन यांना तर मोक्का लावण्याची तयारी केली होती. असा गौप्यस्फोट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  खळबळ उडवून दिली आहे.

“ठाकरे सरकारच्या काळामध्ये मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट त्यावेळचे सीपी संजय पांडे यांना दिलेलं मी कोणताही काम केलं नव्हतं, किंवा कोणती चूक केली नव्हती. त्यामुळे त्यांचे प्रयत्न सफल झाले नाहीत” असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. या प्रकरणात तेव्हाचे सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी काही जणांच्या सांगण्यावरून कट रचल्याचा आरोप त्यांनी केला होता. तर याप्रकरणी विधानसभेत पेन ड्राईव्ह बॉम्ब देखील सादर करण्यात आला होता. दरम्यान, रविवारी सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांना अटक करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंचे याप्रकरणात मोठा दावा केला आहे.

तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांना अटक करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या योजनेचा मी साक्षीदार होतो. महाजन यांच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा १९९९ लावण्याची योजनाही सरकारने आखली होती असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावा केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानेवारी महिन्यात उद्धव ठाकरे सरकारने आपल्याला अटक करण्याची योजना आखल्याचा दावा केला होता. मात्र, त्यावेळी गृहमंत्री असलेले राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी हा दावा फेटाळून लावला होता. मात्र, महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी हा खळबळजनक दावा केला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!