ब्रेकिंग : अभिजीत राऊत यांची बदली, अमन मित्तल नवीन जिल्हाधिकारी
जळगाव, मंडे टूमंडे न्युज वृत्तसेवा : राज्यातील आयएएस आधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत, त्यामुळे राज्यातील अनेक विभागाचा कारभार बदलणार आहे. या बदल्यांमध्ये जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची नांदेड जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली. जळगाव जिल्हाधिकारी म्हणून लातूर मनपाचे आयुक्त अमन मित्तल यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची बदलीची चर्चा सुरू होती. अखेर गुरुवारी राज्य शासनाने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या त्यात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या जागी जळगाव जिल्हाधिकारी पदावर लातूर महापालिकेचे आयुक्त अमन मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश प्रधान सचिव डॉ.राजगोपाल देवरा यांचे कडून जारी करण्यात आले आहेत.
जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी अमन मित्तल हे नाशिक, कोल्हापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, लातूर मनपा आयुक्त म्हणून यांनी याआधी जबाबदारी पार पाडला आहे. त्यांची जळगाव जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. नूतन जिल्हाधिकारी अमन मित्तल हे 2015 बॅचचे जिल्हाधिकारी असून त्यांची आजवरची कारकीर्द उत्तम राहिली आहे.