“तू जर मला पैसे दिले नाही तर तुझ्या विरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल करेल” पाच लाखांची खंडणीची मागणी
जळगाव, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत व्यावसायिकाला पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या महिलेसह एका वकीलाला जळगाव एमआयडीसी पोलीसांनी अटक केल्याचा धक्कादायक घटना उघडकीस आली .या बाबत पोलिसांनी महिलेसह एका वकिलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एका ५५ वर्षीय व्यावसायिकाची त्यांचे ओळखीचे वकील उखा राठोड वय ३० रा. रामदेव वाडी यांच्या माध्यमातून वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका महिलेची ओळख झाली. त्यानंतर त्या ओळखीतून व्यावसायिकाचे महिलेच्या सहमतीने महिलेशी शरीरसंबंध प्रस्थापित झाले. त्याच्या मोबदल्यात महिलेला वेळोवेळी पैसेही देण्यात आले. दरम्यान महिलेने दरवेळी व्यावसायिकाला काहीना काही कारणासाठी फोन करून ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने पैशांची मागणी करण्यास सुरूवात केली.
आतापर्यंत व्यावसायिकाने सदर व्यावसायिक महिलेस ७१ हजार ५०० आणि महिलेची ओळख करून देणारा वकील उखा राठोड याला १५ हजार रूपये दिलेले आहे.
महिला पुन्हा व्यावसायिकाला ब्लकमेल करायला लागली. महिलेने पुन्हा फोन करून पाच लाख रुपयांची मागणी केली. त्यावेळी तिला समजविण्याचा प्रयत्न केला परंतू ती समजण्याच्या मानसिकेतेत नव्हती. परंतु व्यावसायिकाने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर तिने धमकी दिली, तू जर मला पैसे दिले नाही तर तुझ्याविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल करेल तसेच माझी मुलीवर देखील बलात्काराचा केल्याचा खोटा गुन्हा दाखल करून अडकविण्याची धमकी दिली.
सदर ब्लकमेलिंगच्या प्रकाराला कंटाळून व्यावसायिक यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीसांनी शनिवारी ७ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अयोध्या नगर येथे सापळा रचून तिला १ लाख रूपयांची रोकड आणि ४ लाख रूपयाचे चेक घेतांना महिलेसह वकील राठोड याला अटक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीवरून रात्री उशिरा महिलेसह वकील राठोड यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.