विवरा – खिर्डी रस्त्यावर अवैध गौमास वाहतूक करणारा ताब्यात, २० किलो गोमांस जप्त
खिर्डी, ता. रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l रावेर तालुक्यातील विवरा – खिर्डी रोडवर अवैध गोमास वाहतूक करणारी मोटर सायकल जात असताना आरोपी शेख अनिस शेख अय्युब वय २७ रा.रसलपुर ता रावेर, जिल्हा – खळगाव. यास निंभोरा पोलिसांनी पकडले. त्याच्या कडून वीस किलो गोमांस, लोखंडी कुऱ्हाड, मोटार सायकल आरोपीकडून जप्त केली असून पो.शि.किरण जाधव निंभोरा पोलीस ठाणे यांच्या फिर्यादीहून गु.र.नं ०६/२०२५ महा प्राणी संरक्षण अधि १९७६(सुधारित २०१५अन्वये) कलम ५(क),९(अ) प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस रावेर न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे. घटनेचा पुढील तपास स.पो.नी. हरिदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली स.उप.पो.नी. अभय ढाकणे करीत आहेत.
निंभोरा सह परिसरामध्ये अवैध गोमास वाहतूक, व अवैध गाईंची वाहतूक नेहमीचेच झाले असून पोलिसांनी गस्त वाढवून असे प्रकार थांबवायला पाहिजेत अशी मागणी विविध संघटनांकडून करण्यात आली असून, दरम्यान सदर प्रकरणी आमदार अमोल जावळे यांनी गो हत्या बंदी कायदा अंतर्गत असे प्रकार थांबवण्याबाबत पोलिसांना सूचना दिल्या.