भरदिवसा सावदा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गो-वंशाची तस्करी, गो-रक्षकांकडून गो वंशाची सुटका; पोलिसांची भूमिका संशयास्पद ?
सावदा, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क| रावेर तालुक्यातसह सावदा परिसरात मोठ्या प्रमाणात रात्री गो-वंशाची तस्करी सुरु असल्याची बातमी मंडे टू मंडे न्युज ने प्रसारीत केली होती. यावर भरदिवसा वाघोदा येथे पकडण्यात आलेल्या गो वंश तस्करीचा प्रकरणाने शिक्कमोर्तब केला असून गो-रक्षकांमुळे ९ गो वंशाची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणात सावदा पोलीसानी गुन्हा दाखल केल्याचे समजते मात्र, ही तस्करी काही पोलीसांच्या परवानगीनेच होत असल्याचे संपूर्ण रावेर तालुक्यात बोलले जात आहे.
राज्यात गो तस्करीला बंदी असताना अत्यंत निर्दयीपणे तसेच निर्भयतेने दाटीवाटीने कोंबून प्राणी वाहतूकिचा कुठलाही परवाना नसताना अवैधरित्या गो वंशाची वाहतूक करणाऱ्या दोन मालवाहू गाड्या वाघोदा येथे परिसरातील नागरिक व गो रक्षकांना पकण्यात यश आले असून यात कत्तलीसाठी नेण्यात येत असणाऱ्या ९ गो वंशाची सुटका गो रक्षकांनी केली आहे. या प्रकरणाने गो वंश तस्करीवर नियंत्रण ठेवण्यामध्ये सावदा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी पूर्णपणे अपयशी ठरत असल्याने पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर भले मोठे प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.
भर दिवसा रहदारी असणाऱ्या रस्त्यावरून गो-वंशाची तस्करी केली जात असल्याने पोलीस प्रशासनातील काही कर्मचारी तस्कराशी साठ गाठ असल्याशिवाय शक्य नाही. यामागे दरमहा लाखो रुपयांची वसुली पोलिसांकडून केली जात असल्याची चर्चा परीसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असून बिनदिक्कत यामुळेच जनावरांची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मुक्ताईनगर विभागाचे डीवायएसपी शिंदे व सावदा पोलीस ठाण्याचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील तस्करी विरोधात मोहीम राबवून तस्करी थांबवण्यात पुढाकार घेतात का याकडे सर्वांचे लक्ष लागून असून तसेच या प्रकरणात केंद्रिय राज्यमंत्री खासदार रक्षा खडसे व आमदार चंद्रकांत पाटील लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालून आळा बसण्यास प्रयत्न करण्याची मागणी गो प्रेमी नागरिकांकडून करण्यात येत आहे.