भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

मुक्ताईनगर पोलीस प्रशासनाचा प्रभारीराज कारभार, अवैध धंद्यांवाल्यांना खुले रान !

मुक्ताईनगर, अक्षय काठोके| मुक्ताईनगर पोलीस प्रशासनाचा कारभार गेल्या तीन महिन्यापासून प्रभारीराज वर असून शहरासह तालुक्यात खुलेआम अवैध धंद्यांना चांगले दिवस आले आहे. गुटखा विक्री, अवैध गोवंशाची वाहतूक, पत्ता जुगार अश्या अवैध धंद्यांना पोलीस स्थानकात कायमस्वरूपी अधिकारी नसल्याने दोन नंबरवाल्याना फायद्याचे ठरत आहे.

मुक्ताईनगर पासून अवघ्या २० किलोमीटरवर मध्य प्रदेश हे राज्य असून मध्यप्रदेश येथे गुटखाबंदी नसल्यामुळे येथून दररोज मोठ्या प्रमाणात लाखोंचा गुटखा हा मुक्ताईनगर तालुक्यासह, बुलढाणा जिल्हा व जळगाव पर्यंत पोहोचविला जातो. राज्यामध्ये गुटखाबंदी असूनही शहरासह तालुक्यात मात्र गुटखा उघडपणे मिळत असून यात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत आहे. त्यामुळे गुटखाबंदी फक्त कागदावरच राहिली आहे.

अवैध धंदेवाल्यांची पाऊले चालती बोदवडची वाट मुक्ताईनगर चे पोलीस निरीक्षक हे रजेवर असल्यामुळे मुक्ताईनगर पोलीस स्टेशन चा पदभार बोदवड पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील अवैध धंदे चालकांनी बोदवड येथे जाऊन केबिन मध्ये गुप्त बैठक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असून अवैध धंदे जोरात सुरु झाल्याचे नागरिकांमध्ये खमंग चर्चा रंगली आहे तरी याबाबत पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी लक्ष घालण्याची गरज असल्याचे नागरिकात बोलले जात आहे.

मुक्ताईनगर तालुका हा राजकीय दृष्ट्या संवेदनशील मानला जातो. मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक मागील तीन महिन्यापासून सिक रजेवर गेलेले आहेत त्यांना मुक्ताईनगर येथून बदली हवी असल्याचे खात्रीलायक सूत्राकडून माहिती मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!