२२ लाखांचा अवैध गुटखा तस्करी, मुक्ताईनगर मध्ये स्कॉर्पिओसह एकास अटक
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी l मध्यप्रदेशातून मुक्ताईनगर मार्गे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची तस्करी होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिक येथील आयजी च्या पथकाने
गुटख्याचा मोठा कंटेनर पकडून त्यातून सुमारे १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा अवैध गुटखा पकडला होता. आता मुक्ताईनगर पोलिसांनी सुमारे २२ लाखांचाय वर किमतीचा अवैध गुटखा तस्करी करणाऱ्या स्कॉर्पिओ वाहनाला पकडले.
मुक्ताईनगर पोलिसांनी काल रात्री ७.४० वाजेच्या सुमारास महामार्गावर बर्हाणपूर रोडवर स्मशानभूमी समोरील रोडवरून येणाऱ्या एमएच २७ डीएल-२४९६ क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या महेंद्रा स्कॉर्पिओला थांबवून स्कॉर्पिओ ची तपासणी केली असता त्यात २२ लाख ३८ हजार ५० रूपयांचा अवैध सुगंधी तंबाखू व गुटखा आढळून आला. पोलिसांनी गुटख्यासह स्कॉर्पिओ गाडी जप्त केली असून गाडी चालक अजीज शेख बाबू शेख. रा. झांसी नगर, रिसोड, जिल्हा वाशिम. याला अटक करून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलिस उप विभागीय अधिकारी राजकुमार शिंदे व पोलीस निरिक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखालील उपनिरिक्षक राहूल बोरकर, राजेंद्र खनके, छोटू वैद्य, देवसिंग तायडे, विशाल सपकाळे व निखील नारखेडे यांच्या पथकाने केली.