तपीकाठ अवैध दारू विक्री : त्रस्त महिलांनी तक्रार केली म्हणून कारवाई, वरणगाव येथून पोहोच केली जाते दारू, आशीर्वाद कोणाचा?
सावदा, ता. रावेर.मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l सावदा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत तापी काठी असणाऱ्या तासखेडा येथे कोणताही कायद्याचा धाक न बाळगता जोमाने अवैध दारू विक्री केली जात असते. या मुळे अनेक संसार उघड्यावर पडले आहेत, काही संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अवैध दारू विक्रीला कंटाळून गावातील महिलांनी एल्गार पुकारत दारूबंदीसाठी ४ जुलै रोजी सावदा पोलीस स्टेशनवर आक्रोश मोर्चा काढला.
यावेळी नव्याने सावदा पोलिस स्टेशनला रुजू झालेले स.पो.नि. विशाल पाटील यांच्या समक्ष आक्रोश करत ‘आम्हाला न्याय द्या.आमच्या मुलाबाळांना सुखाचा घास खाऊ द्या. दारुमुळे आमचे कुटुंब उघडल्यावर पडले असून आमच्या संसाराची राखरांगोळी होण्यापासून वाचवा.असे सांगत महिलांचे अश्रू अनावर झाले होते.बत्यांनी गावात कायमची अवैध दारुबंदी करण्याची रास्त मागणी केली होती. जेणे करून सावदा पोलीस त्याअनुषंगाने जलदगतीने येथील अवैध दारू विक्री केंद्रांवर ठोस कारवाई करून त्रस्त महिलांना न्याय देतील.
दरम्यान, दारु विक्री केंद्रांवर भुसावळ उत्पादन शुल्क विभागाने तासखेडा येथील अवैध गावठी दारू विक्री केंद्रांवर छापे टाकून ६५ लिटर गावठी पन्नी दारु हस्तगत करून आरोपीविरुद्ध गुन्हेही दाखल केले.
परंतु महत्वाचं मुद्दा असा की, या तापी काठ परिसरातील तासखेडा या गावासह अनेक गावांमध्ये ही दारू आताच विक्री केली जात नाही आहे, तर फार पूर्वी पासून ही अवैध दारू विक्री केली जात आहे. तक्रार झाली तेव्हाच रेड पडते, रेड टाकून जनतेची दिशाभूल केली जाते. अन्यथा नेहमी प्रमाणे हे अवैध दारू अड्डे बिनधास्त सुरू असतात. खात्याला हे माहिती नाही, असे नाही,कुठे अड्डा चालू आहे,कोण अड्डा चालवतयं, हे सर्व खात्याच्या लोकांना माहिती आहे. येथून हप्ते सुद्धा पोहोचत असतात.कोण – कोण घेतं याचा तपास खात्यान् करावा.आणि म्हणूनच येथे तक्रार झाली तरच धाड टाकली जाते.आता तूर्त अवैध अड्डे बंद असले तरी किती दिवस बंद राहतील,हा मोठा महत्वाचा प्रश्न आहे. हे पाहणं महत्वाचं असलं तरी आजही परिसरात अवैध दारू विक्री पूर्ण बंद आहे का?
आणखी एक महत्त्वाची माहिती म्हणजे, वरणगाव येथून दारू विक्रेते बोलोरो,ओमानी व इतर गाड्यांमधून अवैध दारू तापी काठ परिसरात पोहोच करते.या गाड्यांवर कारवाई का होत नाही? या गाड्या कोणाच्या? अधिकाऱ्यांना माहिती नाही का? आता पर्यंत किती वेळा कारवाया केल्या या गाड्यांवर. सर्वांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. प्रेमाचे संबंध आहेत. हप्ते पोहोच होतात?.