रावेर तालुक्यात अवैध गुरांची वाहतूक सुरूच, ४९ गुरांसह कंटेनर जप्त
रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यात गुरांच्या तस्करीला बंदी असताना अत्यंत निर्दयीपणे तसेच निर्भयतेने दाटीवाटीने कोंबून प्राणी वाहतूकिचा कुठलाही परवाना नसताना रावेर तालुक्यात अवैधरित्या गुरांची वाहतूक सुरूच असून रावेर तालुक्यातील पाल खरगोन रस्त्यावर कत्तलीसाठी अवैधरित्या मुऱ्हा जातीच्या नर – मादीचे ४९ म्हशींचे पारडू ट्राला मध्ये निर्दयीपणे कोंबुन नेत असतांना रावेर पोलीसांनी कारवाई करत वाहन जप्त केले.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार दि.१९ जुलै रोजीच्या मध्यरात्री नंतर खरगोन कडून पाल येथील शेरी नाक्या जवळ टाटा कंपनीचा द्राला क्रमंक – आरजे ११ जीसी ५६९७ ला रावेर पोलीसांनी अडवून तपासणी केली. त्यात ४ लाख ९० हजार किंमतीच्या मुऱ्हा नर जातीचे २ ते ३ वर्षाचे म्हशीचे ४५ पारडू तसेच २ ते ३ वर्षाचे ४ मादि जातीचे म्हशीचे पारडू आढळून आले. या कंटेनरमध्ये त्यांना चारा पाण्याची सोय न करता वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय, दोरीने जखडून बांधून निर्दयतेने कत्तल करण्याच्या उद्देशाने अवैध वाहतूक करतांना मिळून आले.
या प्रकरणी पोलीसांनी १५ लाख रुपये किंमतीचा टाटा कंपनीचा कंटेनर जप्त केला. जमशेद ईस्माइलखान, पचनाका (हरियाणा ), इरफान, ( हरियाणा), शकीबखान सोहाबखान, पचनाका (हरियाणा) या तिघांना रावेर पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोहेकॉ विष्णू भिल करीत आहेत .