भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

हतनुर रोडवर गुरांची अवैध वाहतूक, गो- रक्षकांना ३ गुरांची सुटका करण्यास यश, सावदा पोलीसात गुन्हा दाखल

सावदा, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क| रावेर तालुक्यातसह सावदा परिसरात मोठ्या प्रमाणात रात्री गो-वंशाची तस्करी सुरु असल्याची ओरड नेहमीच होत असते. यावर यात आता आणखी एका प्रकरणांची भर पडली असून लूमखेडा शिवारातील हतनुर रोडवर गोवंश वाहतूक करणारे वाहन गो रक्षकांनी पकडुन सावदा पोलीसांच्या ताब्यात दिल्याने सावदा पोलीस स्टेशनमध्ये एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात गो तस्करीला बंदी असताना अत्यंत निर्दयीपणे तसेच निर्भयतेने दाटीवाटीने कोंबून प्राणी वाहतूकिचा कुठलाही परवाना नसताना बुधवारी सायंकाळी साडे सात ते आठ वाजेदरम्यान अवैधरित्या गो वंशाची वाहतूक करणाऱ्या गाडी क्र. एम. एच. ०४ जी. सी. ६९०४  एका गाडीला लुमखेडा शिवारात हतनूर रोडवरती परिसरातील नागरिक व गो रक्षकांना पकण्यात यश आले असून यात कत्तलीसाठी नेण्यात येत असणाऱ्या ३ जखमी अवस्थेत असलेल्या गुरांची सुटका करण्यास गो रक्षकांना यश आले आहे. या प्रकरणात सावदा पोलीस स्टेशनमध्ये वाहन चालक  विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परीसरात सुरू असलेल्या गो वंश तस्करीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुक्ताईनगर विभागाचे डीवायएसपी शिंदे व सावदा पोलीस ठाण्याचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील तस्करी विरोधात मोहीम राबवून तस्करी थांबवण्याची मागणी केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!