अवैध वाळू माफियांची दादागिरी, तलठ्यास मारहाण
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l अवैध वाळूची वाहतूक करीत असताना वाळू वाहतूक करताना वाद झाल्याने ट्रॅक्टर वरून तलाठ्याला खाली ओढून वाद घालत महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की करत पथकातील तलाठ्याला एकाने पकडून मारहाण केली. ही घटना पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली खुर्द येथे रविवारी संध्याकाळी घडली. या ठिकाणी सुमारे ६५ हजार रुपयांचा वाळू साठा जप्त करण्यात आला आहे.
अंतुर्ली खुर्द येथे अवैधरीत्या वाळूचा साठा करण्यात आल्याची माहिती मिळाल्याने महसूल विभागातील चार जणांचे पथक या गावात पोहोचले. त्यात निपाणे तलाठी तात्याराव माणिकराव सपकाळ, बाळद बुद्रुक चे तलाठी आतुल बाबुराव पाटील, पुनगाव चे तलाठी तेजस रोहिदास बराटे, व पाचोरा तलाठी गंगाधर अण्णाराव सुरनर यांचे पथक घटनास्थळी पोहोचले त्यावेळी एक ट्रॅक्टर गिरणा नदी पात्रातून येताना दिसले पथकातील तलाठ्यांनी थांबवले असता वाळूमाफ यांनी पथकाला मारहाण केली तलाठी अतुल पाटील ट्रॅक्टरवर चढले असता त्यांना खाली ओढत वाळू माफिया यांनी ट्रॅक्टर पळून नेले.
या संदर्भात राज भाऊसाहेब पाटील, दुर्गेश उर्फ नानू भाऊसाहेब पाटील, विवेक उर्फ भावड्या वसंत पाटील, निंबा पाटील सर्व राहणार अंतुर्ली खुर्द तालुका पाचोरा या चार जणांना अटक करण्यात आली आहे.