चिनावल परिसरातील अवैध वाळूची तस्करी काही थांबेना, नंबर प्लेट वर खाडाखोड, अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह?
चिनावल, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी l गेल्या काही दिवसांपूर्वी रावेर तालुक्यातील चिनावल गावात अवैध वाळूचे ट्रॅक्टर पकडण्यात आले होते. या संदर्भात अवैध वाळू वाहतूक होत असल्याची तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात आली होती, त्यावर थातूरमातूर कारवाई करण्या आली होती.
पुन्हा चिनावल परिसरात अवैध वाळू वाहतूक सुरू झाली आहे. कारवाई नंतरही पुन्हा वाळू वाहतूक सुरू असल्याने संबंधित अधिकाऱ्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
अवैध वाळू तस्करी साठी बिना नंबरच्या, बिना लाईटच्या ट्रॅक्टरांचा उपयोग केला जातो, काही ट्रॅक्टर चे नंबर मध्ये खोडाखोड केलेली असते, काही ट्रॅक्टरांना तर स्पीड ही कमी असतो. हे ट्रॅक्टर गावातून स्पीड मध्ये जोरात चालवले जात असून मोठ्या अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही.
अशी बिनदिक्कत बिनबोभाट खुलेआंमपणे नदीपात्रातून उत्खनन करून तस्करी केली जाते. या मुळे शासनाचा दररोज लाखो रूपयांचा महसूल बुडत आहे. महसूल विभाग थातुर मातुर कारवाई व्यतिरिक्त काहीही कारवाई करण्यास त्यांना स्वारस्य दिसत नाही. वाळू माफिया वा प्रशासनातील काही अधिकारी कर्मचाऱ्यांचे आर्थिक हित संबंध असल्याची चर्चाही परिसरात बोलली जाते.