भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

चिनावल परिसरात अवैध वाळू वाहतुकीचा धुमाकूळ, यांना आशीर्वाद कोणाचा ?

चिनावल, ता. रावेर.मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l रावेर तालुक्यातील चिनावल येथून जवळच असलेल्या सुकी नदीचा पत्रातून अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्या मध्ये बिना परवाने ट्रॅक्टर चा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. कुठलाही परवाना नसताना वाळू माफिया गावामध्ये कोणाचाही जीवाची पर्वा न करता ट्रॅक्टर ओव्हर स्पीड ने भराघाव वेगाने चालवत गावकऱ्यांच्या जीवा सोबत खेळत आहेत. चिनावल गावा मध्ये ठीक ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले असून ते कॅमेरे रात्री ८ ते सकाळी ४ पर्यंत चेक करावे. यात सर्व काही समोर येईल.

ह्या वाळू माफियांच्या डोक्यावर कोणाचा हात आहे, कोणाच्या संमतीने ही अवैध वाळू वाहतूक होत आहे. असा गावकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे . या संदर्भात चिनावल गावकऱ्यांनी चीनावल येथील तलाठी यांचे कडे तक्रार दाखल केली असून तलाठी कार्यालय चीनावल व रावेर तहसीलदार रावेर यांनी या अवैध वाळू माफियांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी केली असून या आशयाचा तक्रार अर्ज जयेश इंगळे , अविनाश लोखंडे, गुंजन नेमाडे, कुणाल नारखेडे, ठेकचन नेमाडे, वैभव नारखेडे, योगेश ठोंबरे यांनी चिनावल तलाठी याना दिला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!