तासखेडा तापी काठावरील थर्मर पावर स्टेशनच्या हद्दीतील अवैध गळ वाहतूक, पंप धारकांचे नुकसान
सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यातील तासखेडा येथे गेल्या २ ते ३ महिन्यापासून तापी काठावरील थर्मर पॉवर हद्दीत गळ अवैधरित्या काढून विक्री सुरु आहे.
याबाबत सविस्तर असे की, तापी काठावरील थर्मर पावर स्टेशनच्या हद्दीतील गाळाची तासखेडा येथील काही लोक विना परखाना अवैध पणे काढून विक्री करित आहे. सदर ठिकाणांवर शेतीपंप शेतक-यांनी तापी काठावर बसवलेले असुन त्याचे ते लोक बुद्धीपरस्पर नुकसान करीत असल्याने त्यांना नाहाक १० ते १५ हजार रूपयाचा भुर्दंड सोसावा लागत आहे. सदर पंप धारांनी संबंधित गाळ विक्री करणाऱ्या लोकांना समजवुन सांगण्याचा प्रयत्न केला असता ते अरेरा विंची भाषा करतात. असे सांगितले जाते.
गेल्या २ ते ३ महिन्यापासुन तापी काठावर दररोज ५ ते ६ ट्रैक्टर मोठ्या प्रमाणात सकाळी ४ वाजेपासुन संध्याकाळ पर्यंत दादागिरीने वाहतूक करीत असतात. या प्रकाराने ग्रामस्थांसह पंप धारक त्रस्त झाले असून हा प्रकार तासखेड्यासह परिसरात दररोज जोमात सुरू आहे. या साठी गुंडगिरीचा वापर केला जात आहे. या प्रकारावर संबंधितांनी कारवाई करावी अशी मागणी पंप धारकांसह त्रस्त ग्रामस्थांकडून केली जात आहे..


