भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

फैजपूर मध्ये अवैध कत्तलखाना उध्वस्त, २२० किलो गोवंश जातीचे मास जप्त

फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | यावल तालुक्यातील फैजपूर येथे मिल्लतनगर मधील मज्जित जवळ पत्र्याच्या शेड मध्ये सुरू असलेला अवैध कत्तलखाना उध्वस्त करण्या आला. या ठिकाणाहून २२० किलो गोवंश मासाचे तुकडे व इतर साहित्य जप्त करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की, फैजपूर येथे मिल्लतनगर मधील मज्जित जवळ पत्र्याच्या शेड मध्ये शेख नईम उर्फ नम्मा अब्दुल रहीम कुरेशी यांच्या घरा जवळ अवैध कत्तलखाना सुरू असल्याची माहिती फैजपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांना मिळाली. या माहितीची खात्री करून तेथे सापळा रचून कारवाई केली.

घटनास्थळी अक्रम शेख नईम कुरेशी, वसीम शेख अब्दुल रहीम कुरेशी, आणि शेख मुस्तकिम शेख कलीम हे तीन जण या आढळून आले. त्यांच्या जवळ २२० किलो वजनाचे गोवंश मासाचे तुकडे, २३ किलो वजनाचे बैलाचे कातडे, वजन मापे, तराजू काटा, मास कापण्यासाठी लागणारी लोखंडी सुरी, लाल रंगाचा एक जिवंत गोवंश जातीचा गोऱ्हा असा मुद्देमाल आढळून आला. घटनास्थळी तातडीने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून कायदेशीर पुढील कारवाई करून ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी फैजपूर पोलीस स्टेशनला पोहेका रविंद्र काशिनाथ मोरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उप निरीक्षक विनोद गाभाणे हे करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!