भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

देशी व जर्सी गायींची विना परवाना निर्दयतेने कोंबून अवैध वाहतूक, ५ गायींची सुटका

रावेर तालुक्यातील घटना

रावेर, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l रावेर – रसलपूर रोडवरील शिंदखेडा फाट्यावर छोट्या मालवाहू वाहनात पशुधन निर्दयतेने कोंबून विना परवाना वाहतूक करीत असलेले वाहन एम.एच. ०४/ एफ.डी. ३५४३ रावेर पोलिसांनी पकडुन वाहनातील ५ गायींची मुक्तता करण्यात आली.

८ सप्टेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास दीड ते तीन वर्षे वयोगटातील ५८ हजार रुपये किमतीच्या पाच देशी व जर्सी गायींची मालवाहू वाहनातून रावेर रसलपूर रोडवरील शिंदखेडा फाट्यावर विना परवाना वाहतूक करीत असताना शेख ऐफस शेख अफजल.ववय २८, रा. सिद्धार्थ नगर, रावेर. याला वाहनासह पकडुन गस्तीवरील रावेर पोलिस पथकाने हे वाहन जप्त करून त्यातील पाचही गायींना जीवदान दिले. त्यांची गोशाळेत रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, १ लाख किमतीचे छोटे मालवाहू वाहन व ५८ हजार रुपयांच्या गायी असा १ लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज जप्त करून आरोपी शेख ऐफाज शेख अफजल यास रावेर पोलिसांनी अटक केली आहे.

पो. कॉ. राहुल ईश्वर परदेशी यांच्या फिर्यादीवरून शेख ऐफाज शेख अफजल या आरोपी विरुध्द रावेर पोलिस स्टेशनला गोवंश हत्याबंदी, गोवंश अवैध वाहतूक व प्राण्यांच्या अमानुष छळ प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रावेर पोलिस स्टेशनचे फौजदार घनश्याम तांबे करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!