पाडेगाव आंबेडकर सोसायटी लोक वस्ती मधील आरोग्यास हानिकारक, घातक वराह (डुक्कर ) पालन तात्काळ हटवा – वीर योद्धा प्रतिष्ठान
सातारा, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l दि.११/०३/२०२५ रोजी वीर योद्धा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब ढावरे यांच्या नेतृत्वाखाली तसेच खंडाळा तालुका अध्यक्ष सलीम भाई शेख यांच्या अध्यक्षतेखाली पाडेगाव आंबेडकर सोसायटी येथे लोक वस्ती मधील जनतेच्या आरोग्यास हानिकारक वराह पालन तात्काळ हटवावे या साठी वीर योद्धा प्रतिष्ठान खंडाळा तालुक्याच्या वतीने खंडाळा नायब तहसीलदार चेतन मोरे तसेच खंडाळा तालुका सहगटविकास अधिकारी मांढरे साहेब यांना निवेदन देण्यात आले.
पाडेगाव आंबेडकर सोसायटी मधील वराह (डुक्कर) पालन आरोग्यासाठी किती हानिकारक आहे त्याबद्दल वीर योद्धा प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष चांद भाई शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की पाठीमागील पाच सहा वर्षांपासून आम्हाला या वराह पालनाचे मुळे कितीतरी आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत आंबेडकर सोसायटीमध्ये सर्वत्र दुर्गंधी पसरलेले आहे सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे यामुळे आमच्या माय माऊली भगिनी वृद्ध लोक यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच आमच्या इथून दुसरीकडे नांदायला गेलेल्या मुली परत आपल्या माहेरी येण्यासाठी धजावत नाहीत कारण ह्या घाणीच्या साम्राज्यामुळे दुर्गंधीमुळे पै पाहुणे सुद्धा ह्या आंबेडकर सोसायटीमध्ये येत नाहीत तसेच कितीतरी लोक हे आंबेडकर सोसायटी सोडून दुसरीकडे राहायला गेलेले आहेत याचा प्रशासनाने विचार विनिमय करून लवकर तोडगा काढून आंबेडकर सोसायटी मधील वराह पालन तत्काल हटवावे.
तसेच हे निवेदन सादर करताना पाडेगाव आंबेडकर सोसायटी मधील जनतेचा आक्रोश दिसून येत होता.
वीर योद्धा प्रतिष्ठानचे खंडाळा तालुका अध्यक्ष सलीम भाई शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की लवकरात लवकर पाडेगाव आंबेडकर सोसायटी मधील वराह पालन तात्काळ न हटवल्यास आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू. यावेळी स्वतः वीर योद्धा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बहुजनांचे कैवारी सदैव जनतेसाठी तत्पर असणारे अमित उर्फ बापूसाहेब ढावरे स्वतः हजर होते तसेच निवेदन देताना खंडाळा तालुक्यातील पदाधिकारी खंडाळा तालुका उपाध्यक्ष स्वप्निल जावळे, खंडाळा तालुका संघटक राहुल येळे, विशाल भोसले, पुरंदर तालुका उपाध्यक्ष नागेश बरकडे, सोनाजी बरकडे, प्रशांत बरकडे,दादासो अवघडे ,देविदास वाघमारे ,बिपिन मेनन ,अनिकेत लवांडे ,अनिकेत मोरे, सौरभ जाधव ,जावेद शेख ,कार्तिक बेंगळे ,अमर अतार ,बबलू सय्यद, आज्जो सय्यद, सरफराज मुल्ला, शकील शेख ,शाहरुख सय्यद ,मोसिन शेख, तसेच ईतर पदाधिकारी उपस्थित होते .