धक्कादायक : लसूण खरेदी करताय? सावधान…केली जातेय, सिमेंट पासून तयार केलेल्या लसूण ची विक्री
मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l लसूण विक्रीत काळाबाजार होत असल्याची एक धक्कादायक घटना समोर आली असून चक्क सिमेंट पासून तयार केलेल्या लसणाची विक्री करण्यात येत आहे.
ही घटना अकोला शहरातील असून एका लसूण विक्री फेरीवाला कडून एका निवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांच्या पत्नीने पाव किलो लसूण घेतला त्या लसूण मध्ये हुबेहूब लसणाच्या कांद्या सारखा दिसणारा एक कांदा असा आढळला आणि तो लसूण सोलायला लागले असता ते लसूण सोलला जात नव्हता,त्या नंतर सुरीने कापायचा प्रयत्न केला असता त्या लासूना मधून सिमेंट बाहेर निघायला लागले, आणि त्या लासूनाचे वजन मोजले असता एकाच लासूनाच्या कांद्याचे वजन १०० ग्रॅम भरले, तो लासूनाचा कांदा सिमेंट ने तयार केलेला आढळला. व त्याला पांढरा रंग दिलेला होता. हा प्रकार जास्त वजन व जास्त पैसे उकळण्यासाठी केलेली लबाडी असल्याचा प्रकार आहे.