भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

धक्कादायक : शालेय पोषण आहारात पुन्हा आढळल्या अळ्या

मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l राज्यात अंगणवाडीत बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात पाल, झुरळ,उंदीर , चिमणी, मेलेले मच्छर,अळ्या अशा अनेक प्रकारच्या कीटक, पक्षी, सरपटणारे जीव मेलेले शालेय पोषण आहारात सापडण्याचे प्रकार नेहमीच घडत आहेत. अशीच घटना पुन्हा लातूर मधील रेणापूर तालुक्यातील घनसर गावात घडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गरोदर महिलांना व बालकांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारात चक्क अळ्या व जाळी लागलेलं आहार सापडल्याने तीव्र नाराजीची भावना नागरिकांमध्ये पसरली आहे

महिला व बालविकास विभाग मार्फत गरोदर महिलांना, बालकांना पोषण आहाराचा पुरवठा करण्यात येतो. या बालकांना दिल्या जाणाऱ्या खाऊत ,या पोषण आहारात अळ्या व जाळ्या सापडल्याने हा पोषण आहार खरंच पोस्टिक असतो का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील घनसर गावातील अंगणवाडीत  हा खाऊ बालकांना २ तारखेला दिला होता, तो पॅकिंग असलेला खाऊच पॅकेट आज फोडल्यानंतर त्या अळ्या आढळल्या त्या बरोबर त्या खाऊला जाळ्या लागलेल्या आढळल्याने बालकांच्या व गर्भवती मतांच्या जीवाशी खेळ खेळला जात असल्याची भावना नागरिकांमध्ये पसरली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!