क्राईमजळगाव

जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक घटना : ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ४० वर्षीय नराधमाचा अत्याचार

जळगाव,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l एका ४० वर्षीय नराधमाने लहान मुलां सह लपंडाव खेळत असतांना एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीला घरात कोडून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव मधील रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत परिवारासह रहात असलेली ११ वर्षीय अल्पवयीन मुलगी १२ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास लहान मुलांसोबत लपंडाव खेळत असतांना खेळता खेळता सिध्दार्थ वानखेडे,वय ४० वर्ष. याच्या घरात गेली. त्यावेळी सिध्दार्थ याने घराचा दरवाजा बंद करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

त्या नंतर सिध्दार्थ वानखेडे हा फरार झाला. सदरची घटना लक्षात येताच पिडीत मुलीच्या आईने रामानंद नगर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असता संशयित आरोपी सिध्दार्थ वानखेडे यांच्या विरोधात २८ ऑगस्ट बुधवार रोजी संध्याकाळी ७ वाजता रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून रामानंद नगर पोलीसांनी या गुन्ह्यातील फरार झालेल्या संशयित आरोपीला मुंबई मधून अटक केली. सपोनि रोहिदास गभाले हे पुढील तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!