धक्कादायक : अल्पवयीन गतीमंद मुलीचा विनयभंग, गुन्हा दाखल
ठाणे, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l बदलापूर मध्ये आदर्श शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराची घटना ताजी असताना अल्पवयीन गतीमंद मुलीचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेने ठाणे जिह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
ही धक्कादायक घटना ठाणे जिह्यातील कळवा येथील महापालिका रुग्णालयात घडली. कळव्यात एका अल्पवयीन गतीमंद मुलीचा विनयभंग रुग्णालयाच्या परिसरातील गार्डन मध्ये करण्यात आला आहे. विनयभंग करणारा आरोपी प्रदीप शेळके याला पोलिसांनी ताब्यात घेतल असून कळवा पोलिस स्टेशनला या संदर्भात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
कळवा रुग्णालय हे महापालिकेचं रुग्णालय असून येथे मुरबाड, शहापूर पासून रुग्ण येत असतात. पिडीत अल्पवयीन गतीमंद मुलीचा विनयभंग रुग्णालयाच्या परिसरात गार्डन मधे झाल्याचा प्रकार पिढी मुलीच्या नातेवाईकाने बघितला त्यांनी लागलीच या प्रकरणी डॉक्टरांना माहिती दिली असता डॉक्टरांनी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने आरोपी प्रदीप शेळके याला ताब्यात घेऊन त्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.