महाराष्ट्रशैक्षणिक

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचा अर्ज भरण्याची मुदत वाढविली

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी- बारावीची फेब्रुवारी- मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या परिक्षेचा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता विद्यार्थी २२ नोव्हेंबरपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज भरु शकतात. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निर्णयानुसार ३१ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह अर्ज भरता येणार आहे. तर १५ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज करता येणार आहे. राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहेत. त्यामुळे आता २२ नोव्हेंबरपर्यंत तुम्ही अर्ज भरु शकतात. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ करण्यात आल्याने आणखी काही वेळ विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!