उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल, डॉक्टरांना संरक्षणाची गरज, डॉ. प्रशांत अहिरे निर्दोष
सावदा, ता.रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क lअन्यायकारक नुकसान भरपाई साठी डॉक्टरांना फालतु खटल्यापासुन संरक्षण मिळणे आवश्यक असल्याचे मत मुंबई हाय कोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने व्यक्त केले.
या बाबत अधिक माहिती अशी की, विवरे, ता रावेर येथील डॉ.प्रशांत अहीरे हे मागील १४ वर्षा पासुन श्री समर्थ हॉस्पीटल नावाने वैद्यकिय व्यावसाय करतात त्यांचे विरोधात आ पी सी ३०४/ अ प्रमाणे सचिन अरुण पाटील यांनी पत्नी गायत्री हिच्या मृत्युसाठी डॉक्टर जबाबदार आहे असा आरोप केला होता संबंधीत उपचार हा दिनांक १३/५/२०२१ ते १६/५/२०२१ या कोरोनाच्या साथीच्या काळात होता कोरोना साथीच्या काळात उपचार सुरु असतांना प्रकृतीत सुधारणा न झाल्याने रुग्ण पुढील ३ रुग्णालय डॉ.सुनिल चौधरी सावदा डॉ राजेश डाबी जळगाव व डॉ स्वप्नील पाटीत ओम क्रिटी केअर येथे उपचार घेत असतांना मृत्यु पावली.
या खटल्याविरुद्ध डॉ प्रशांत अहीरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात रीट याचिका दाखल करून खटला रद्द करण्यास विनंति केलि व उच्च न्यायालयात डॉ प्रशांत अहीरे यांच्या वरील खटला
रद्द करत डॉ प्रशांत अहिरे निर्दोष असल्याचे उल्लेख केला
नुकसान भरपाई साठी डॉक्टरां वर अन्यायकारक खटले वाढले आहे असेही मत उच्च न्यायालया चे न्यायमुर्ति विभा काकणवाडी व न्यायमुर्ति संतोष चपळगावकर यांनि व्यक्त केले . उपचाराच्या कागदपत्रावरून मेंदुत रक्तस्त्राव झाल्याचे स्पष्ट पणे दिसुन येते तसेच समीतिच्या अहवालात मेंदुतील रक्तस्त्राव व औषधी चा अतार्तिक डोस कारणीभुत होता असे कुठेही म्हटले नाही तसेच डॉ अहीरे यांची भुमीका फक्त पहिल्या ४ दिवसांपुरतीच मर्यादीत होति असे निरीक्षन नोंदविले .