भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावराजकीयरावेर

बँक निवडणुकीत झारीच्या शुक्राचार्यमुळे दगा-फटका– आ. गिरीश महाजन

रावेर, मंडे टू मंडे वृत्तसेवा : जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनल ठरलं असतांना जिल्हातील ‘झारीच्या शुक्राचार्य’ मुळे आमच्या सोबत दगा फटका झाल्याचं घणाघात रावेर मध्ये बोलतांना भाजपा नेते माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी केला आहे.

माजी मंत्री गीरीश महाजन हे  मध्य प्रदेशात भाजपाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जात असताना आज रावेर येथे धावती भेट दिली. त्यावेळी आ. गिरीश महाजन बोलतांना म्हणाले, जिल्हा बँकेच्या सर्वपक्षीय पॅनल संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत बोलूनही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ऐनवेळी आपली भूमिका बदल्यामुळे आमच्या सोबत दगा-फटका झाला. हे सर्व जिल्हातील झारीच्या शुक्राचार्यमुळे घडल्याचे माजी मंत्री गिरीष महाजन यांनी म्हटले असून सर्वपक्षीयाच्या नावाखाली आमच्या सोबत दगा-फटका केला. ऐनवेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ऐनवेळी बदलल्यामुळे हे सर्व घडले आहे. अशी घणाघाती टीका त्यांनी यावेळी केला. तसेच मी स्वत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत सर्वपक्षीय पॅनल संदर्भात बोललो. परंतु त्यांनी आपली भूमिका बदलली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!