भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जामनेरराजकीय

जामनेर मध्ये १० उमेदवार रिंगणात, गिरीश महाजन व दिलीप खोपडे यांच्यात खरी लढत

जामनेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जामनेर विधानसभा मतदारसंघात २२ उमेदवार यांचे अर्ज वैध होते. या पैकी १२ उमेदवारांनी माघारीच्या शेवटच्या दिवशी आपले अर्ज मागे घेतले असून आता एकूण १० उमेदवार रिंगणात आहेत मात्र मुख्य लढत महायुती कडून भाजपचे मंत्री गिरीश महाजन व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार दिलीप खोडपे यांच्यातच होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये खोडपे दिलीप बळीराम ; राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार), गिरीश दत्तात्रय महाजन(भारतीय जनता पार्टी), विशाल हरिभाऊ मोरे (बहुजन समाज पार्टी), अण्णासाहेब रामचंद्र राठोड (हिंदु समाज पार्टी), प्रभाकर पंढरी साळवे (राष्ट्रीय समाज पक्ष), सेवानिवृत्त पोलीस मदन शंकर चव्हाण (भारतीय जन सम्राट पार्टी) तर चार अपक्ष उमेदवार अनिल रंगनाथ पाटील, दिलीप मोतीराम खामकर, राजेन्द्र सुभाष खरे, राहूल रॉय अशोक मुळे असे एकूण १० उमेदवार रिंगणात असून उद्यापासून खरी प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. पण अपक्ष उमेदवार कोणासाठी डोकंदुखी ठरतात याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!