भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरराजकीय

मुक्ताईनगर मतदारसंघात पाच हजार कोटी निधितील विकास हरवला – रोहिणी खडसे

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी l मुक्ताईनगर मतदारसंघासात महायुतीचे सरकार आल्यापासून विकास कामांसाठी 5000 कोटी रुपयांचा निधी दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्ताईनगर येथिल जाहीर सभेत सांगितले होते परंतु मतदारसंघात कुठेच विकास झालेला दिसुन येत नाही मग एवढा निधी गेला कुठे असा प्रश्न जनतेला पडला असुन निमखेडी खुर्द हे गाव आमदारांनी विकसासाठी दत्तक घेतलेले गाव आहे इथे तरी 5000कोटी मधून झालेला विकास सापडेल अशी मला आशा होती परंतु इथे तर गाव अंतर्गत रस्ते, गटारी यांची दुर्दशा झालेली असुन विकास नावाला सुद्धा सापडत नाही आहे मग 5000 कोटींचा निधी गेला कुठे? असा प्रश्न मुक्ताईनगर मतदारसंघांच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार ॲड. रोहिणी एकनाथराव खडसे यांनी निमखेडी खुर्द येथे प्रचारा दरम्यान उपस्थित केला

मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी खुर्द येथे जन आशिर्वाद पदयात्रा काढून रोहिणी खडसे यांनी मतदारांचे आशिर्वाद घेऊन मतदारांशी संवाद साधत त्यांना मतदानरूपी आशिर्वाद देण्याची विनंती केली. यावेळी त्यांना मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला अस यावेळी त्या म्हणाल्या.

विधानसभा क्षेत्र- मुक्ताईनगर तालुका गाव भेट संवाद दौरा

आ एकनाथराव खडसे यांनी तिस वर्ष मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असताना जातपात, पक्षीय मतभेद न करता सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून मतदारसंघातील खेडोपाड्यांचा विकास केला. त्यांच्या माध्यमातून निमखेडी खुर्द गावाला चहूबाजूंनी जोडणाऱ्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले गावात सामाजिक सभागृह, व्यायामशाळा, अंतर्गत रस्ते, गटार अशा अनेक मुलभूत सुविधांची कामे करण्यात आली.


निमखेडी खुर्द हे गाव विद्यमान आमदार महोदयांनी विकासासाठी दत्तक घेतल्याचे घोषित केले होते त्यामुळे या गावात तरी मुख्यमंत्री महोदयांनी मुक्ताईनगरच्या सभेत मुक्ताईनगर मतदारसंघात 5000 कोटी रूपये विकास निधी दिल्याचे सांगितले होते त्या विकास निधी अंतर्गत झालेला मतदासंघांत हरवलेला विकास सापडेल अशी मला आशा होती परंतु गेले पाच वर्षात गावाची अत्यंत दुर्दशा झालेली आहे गावात रस्त्यांवरून सांडपाणी वाहत आहे त्यामुळे पायदळ चालताना त्रास होत आहे. आ एकनाथराव खडसे साहेबांच्या माध्यमातुन गावासाठी मंजुर झालेल्या पाणी पुरवठा योजनेला आमदार महोदयांनी स्थगिती आणली त्यामुळे ग्रामस्थांना घरापर्यंत पाणी मिळण्यासाठी अडचणी येत आहेत.


तसेच एकनाथराव खडसे यांच्या कार्यकाळात मंजुर ग्रामपंचायत भवन बांधकाम प्रस्तावाला विद्यमान आमदारांनी स्थगिती दिली. सध्या आ . एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातुन बांधण्यात आलेल्या सामाजिक सभागृहात ग्रामपंचायत कार्यालय सूरू आहे. दत्तक गावात पाच वर्षात नविन ग्रामपंचायत इमारत सुद्धा विद्यमान आमदार महोदय निर्माण करु शकले नाहीत. गावांतील काही तरुणांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना केल्या प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. अडीच वर्षांपूर्वी मुक्ताईनगर येथिल जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी हे गुन्हे मागे घेण्यात येतील असे जाहीर केले होते परंतु अडीच वर्षांचा कालावधी उलटूनही गुन्हे मागे घेतले गेले नाहीत.


आ.एकनाथराव खडसे यांनी निमखेडी परिसरातील गोरगरीब घरातील मुलांना गावातच म माध्यमिक शिक्षणाची सोय व्हावी यासाठी मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी मार्फत निमखेडी येथे नविन माध्यमिक हायस्कूलची स्थापना केली त्यामुळे गोरगरिबांच्या मुलांना गावात मध्यामिक शिक्षणाची सोय ऊपलब्ध झाली या हायस्कूलचे विद्यार्थी गरीब परिस्थितीतून पुढे येत आपल्या मेहनतीने उच्च शिक्षण घेत आहेत , काही विदयार्थी स्पर्धा परिक्षेत यश मिळवून आपल्या गावाचे परिसराचे नाव उज्वल करत आहेत त्याबद्दल मला या सर्व विद्यार्थ्यांचा अभिमान आहे
भविष्यात गावात मुलभूत सुविधांच्या निर्माणा बरोबर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अद्यावत लायब्ररीचे निर्माण करेल असा माझा शब्द असल्याचे सांगुन
गावाचा मतदारसंघाचा गेल्या पाच वर्षात रखडलेला विकास मार्गी लावण्यासाठी आ एकनाथराव खडसे, जेष्ठ नेते रविंद्र भैय्यासाहेब पाटिल , अरूण दादा पाटिल, राजाराम महाजन, उदय सिंह पाटिल आणि जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली लढत असलेल्या या निवडणुकीत मतदानरुपी आशिर्वाद देण्याची रोहिणी खडसे यांनी ग्रामस्थांना विनंती केली
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस ईश्र्वर रहाणे, माजी सभापती निवृत्ती पाटिल, सुवर्णाताई साळुंखे, रामभाऊ पाटील यांच्यासह ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!