भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

मुक्ताईनगरात अवैध धंदेवाल्याची वाढली मुजोरी ; सट्टा पिढी चालवण्याऱ्या गजानन मालगेची रात्री पत्रकाराच्या घरी जाऊन मारून टाकण्याची धमकी !

मुक्ताईनगर, प्रतिनिधी| मुक्ताईनगरात अवैध धंद्यांबाबत नेहमीच राज्यात गाजताना पाहिले आहे आता अवैध धंद्यावाल्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढतच असून अवैध सट्टा पिढी चालवण्याऱ्या गजानन श्रीकृष्ण मालगे याची पत्रकार च्या घरी जाऊन जातीवाचक शिवीगाळ करत बघून घेण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे अवैध धंद्यावाल्यांनी थेट पोलिसानाच आव्हानं दिलें आहे.

मुक्ताईनगरात अवैध धद्यांवर विधिमंडळात राष्ट्रवादीचे नेते आ. एकनाथ खडसे व अपक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी वारंवार प्रश्न उपस्थित करून अवैध धंद्यांचे मुक्ताईनगर मुख्य केंद्र बिंदू असल्याचे सांगितले होते. मात्र, अद्यापही तालुक्यांतील अवैध धंदे बंद करण्यास प्रशासन अपयशी ठरल्याचे पाहायला मिळत असून उलट अवैध धंदे चालक गुंडगिरी करत असल्याचा गंभीर प्रकार घडत आहे. शहरातील प्रवर्तन चौकात खुलेआम सट्टा पिढी, जुगार अड्डा सुरू असून त्याबाबतची बातमी लावली असता गजानन श्रीकृष्णा मालगे सट्टा पिढी चालक याचा मावस भाऊ विजय पोलाखरे याने मंडे टू मंडे न्यूजचे पत्रकार अक्षय काठोके यांना फोनवरून बातम्या का लावतोस, आमचे आर्थिक नुकसान होते असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करत तुला बघून घेऊ, तुझ काम लावू अशी धमकी दिली यावरून पत्रकार काठोके यांनी गजानन मालगे यांना समजूतीसाठी फोन लावला असता की तुम्ही विजय पोलाखेरेला समजावून सांगा तो शिवीगाळ करत आहे. याचा राग येऊन अक्षय काठोके याच्या रात्री घरी येऊन आई व बाबांना गजानन मालगे यांनी शिवीगाळ केली यावरून मुक्ताईनगर पोलिसात गजानन श्रीकृष्ण मालगे व विजय देविदास पोलाखेरे यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहे

तसेच फिर्याद दाखल केल्यानंतर वैभव गलवाडे उर्फ गब्या राहणार फैजपूर हल्ली मुक्काम मुक्ताईनगर हा मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे आला व त्याने अक्षय काठोके याच्या हातातून मोबाईल हिसकावून फोनवर बोलणारा मी होतो ही फिर्याद मागे घे अन्यथा तुला मारून टाकेल अशी धमकी पोलीस स्टेशन आवारात येऊन रात्री 12.30 वाजेला पोलिसासमोर दिली तरी पोलिसांनी कुठली कारवाई केली नाही. प्रवर्तन चौकात खुलेआम सट्टा, जुगार, अड्डा चालतो यावर पोलिसांचा अंकुश राहिला नाही. त्यामुळेच बातम्या लावल्यावर अवैध धंदे चालक पत्रकारांच्या घरी जाऊन धमकी देऊन येत आहे यांची एवढी मुजोरी वाढली कोणामुळे? याबाबत पोलिस अधीक्षक एम राजकुमार यांनी लक्ष घालावे अशी मागणी सामान्य नागरिक व्यक्त करीत आहे

दरम्यान अवैध धंद्याबाबत वेळोवेळी विधानसभेत आवाज उठवणारे विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे विधानसभा आमदार चंद्रकांत पाटील यावर काय भूमिका घेतात याकडे सर्व मतदासंघांचे लक्ष लागून आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!