मुक्ताईनगरात लाखोंचा विमल गुटख्याची गाडी पकडली; कारवाई मात्र गुलदस्त्यात, पोलिस व RTO प्रशासनाच्या भूमिकेविषयी मोठे प्रश्न ?
मुक्ताईनगर प्रतिनिधी (अक्षय काठोके) : मुक्ताईनगर येथे अंदाजे 14 ते 15 लाखाचा विमल गुटख्याचा माल असलेली गाडी पकडण्यात आली असून मात्र, याबाबत कुठली कारवाई करण्यात आली यांची माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे पुरणाड फाट्यावरील चेक पोस्टवर आरटीओ 24 तास हजर असताना विमल गुटक्याची गाडी पास होते कशी यातच सर्व गौडबंगाल असल्याचे सांगितले जात आहे.
अधिकृत असे की मुक्ताईनगर येथील पुरनाड फाट्यावर नाशिक येथील आईजी पथकाकडून काल MH 19BM 5400 या बोलेरो पिकप वाहनावर कारवाई करत गाडी मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे लावण्यात आली असून कारवाई अद्याप गुलदस्तात आहे तरी एवढा मोठा माल आयजी पथकाकडून ह्स्तगत होऊन सुद्धा मुक्ताईनगर पोलीस अनभिन्न्न असल्यामुळे नागरिक शंका उपस्थित करत असून पुरणाड फाट्यावरील चेक पोस्टवर आरटीओ 24 तास हजार असताना विमल गुटक्याची गाडी पास कशी झाली याबाबत सुद्धा नागरिक प्रश्न उपस्थित करीत आहे
काल एवढा मोठा माल असलेली गाडी काल पासून पोलीस ठाण्यात लागून असून सुद्धा मुक्ताईनगर पोलीस कारवाई करण्यात टाळाटाळ करत असल्यामुळे नागरिक शंका उपस्थित करत असून विशेष म्हणजे पुरणाड फाट्यावरील चेक पोस्टवर आरटीओ 24 तास हजर असताना विमल गुटक्याची गाडी पास झाली कशी याबाबत सुद्धा नागरिक प्रश्न उपस्थित करीत असून गुटखा तस्करीला RTO व पोलिस विभागाच्या आर्थिक हितसंबंधांची किनार असल्याचे संपूर्ण परिसरात बोलले जात आहे.