रावेरात सोने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या २ महिलांकडून दीड लाखांची पोत लंपास
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
रावेर, मंडे टू मंडे वृत्तसेवा । शहरातील एका सोन्याच्या दुकानात २ अनोळखी महिलां खरेदीच्या बहाण्याने सराफ दुकानात आल्या मात्र, दुकानदाराला फसवत १ लाख ५० हजारांचे मंगळसूत्र लंपास केल्याची घटना आज शहरात उघडकीस आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, शहरातील हेडगेवार चौकात असलेल्या श्री महालक्ष्मी अलंकार या ज्वेलर्स दुकानात ग्राहक बनून २ अनोळखी महिला आल्या त्यांनी दागिने पसंत करण्याच्या बहाण्याने १,५०,००० रूपये किंमातीचे (काळे मणी लावलेले व त्यावर हालमार्कचे चिन्ह SMA 916 असलेले) ३८.५०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र दुकानदाराला फसवून चोरी केली. मात्र ही बाबत मालक दुकान बंद करताना स्टॉक चेक करीत असताना सोन्याचे मंगळसूत्र कमी असल्याचे लक्षात आल्याने CcTV फुटेज चेक केले असता त्या २ महिलांनी फिर्यादी व फिर्यादीचा मुलगा यांचा विश्वास संपादन करून हात चलाखीने त्यांचा विश्वासघात घेत सोन्याची पोत पाहत असताना एक पोत चोरून नेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात २ अनोळखी महिलांच्या विरोधात सराफ दुकानदार नरेंद्र सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरू भादवि कलम-406,380,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो.नि शितलकुमार नाईक करीत आहेत