रावेर तालुक्यात शेतकऱ्यांच्या ६०२ हेक्टर क्षेत्र केळी पिकाचे सुमारे २५ कोटींचे नुकसान, घरांची पडझड २० लाखांचे नुकसान
रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l रावेर तालुक्यात शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसाच्या तडाख्यामुळे २९ गावांतील सुमारे ७०४ शेतकऱ्यांच्या ६०२ हेक्टर क्षेत्रावरील केळी पिकाचे सुमारे २५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, तसेच सात गावांतील ३४५ घरांचे घरावरील पत्रे व पडझड हाेवून १५ ते २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना तहसील कार्यालयातर्फे पाठविण्यात आला आहे. तसेच तालुक्यातील सात गावांतील ३४५ घरांचे घरावरील पत्रे व पडझड हाेवून १५ ते २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना तहसील कार्यालयातर्फे पाठविण्यात आला आहे
शनिवारी संध्याकाळी रावेर तालुक्यात सहा वाजेच्या सुमारास जाेरदार वादळी पावसाचा तडाखा बसला. त्यामुळे तालुक्यातील केळी पीक जमीनदाेस्त हाेऊन माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. महसूल विभाग व पंचायत समिती विभागातर्फे नुकसानीचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला.
रावेर तालुक्यात केळी पिकाचे झालेले अंशतः नुकसान शेतकरी संख्या व बाधित क्षेत्र असे : खिराेदा प्र. यावल ५६ शेतकरी, ९५ हेक्टरवर नुकसान, कळमाेदा २० शेतकरी, ३४ हेक्टर, सावखेडा बुद्रूक ८ शेतकरी १४ हेक्टर, सावखेडा खुर्द ७ शेतकरी’, १३ हेक्टर, अटवाडे १२० शेतकरी ९० हेक्टर, दाेधे ५५ शेतकरी ४० हेक्टर, नेहेते १८ शेतकरी १० हेक्टर, खानापूर २८ शेतकरी १२ हेक्टर, निरूळ ७ शेतकरी ६ हेक्टर, चाेरवड ७ शेतकरी ६ हेक्टर, अजनाड २० शेतकरी १९ हेक्टर, पाडळे खुर्द १० शेतकरी ७ हेक्टर, कर्जाेद १७ शेतकरी ८ हेक्टर, वाघाेड ७ शेतकरी ५ हेक्टर, अहिरवाडी ९ शेतकरी ४ हेक्टर, माेहगण ३’शेतकरी २ हेक्टर, सावदा १५ शेतकरी १२ हेक्टर, रायपूर ५ शेतकरी ३ हेक्टर, सुदगाव ३ शेतकरी २ हेक्टर, रणगाव ५ शेतकरी ३ हेक्टर, उदळी खुर्द ३ शेतकरी २ हेक्टर, चिंचाटी २२ शेतकरी २५ हेक्टर, तांदलवाडी १०० शेतकरी ७५ हेक्टर, मांगलवाडी १८ शेतकरी ८ हेक्टर, सिंगत २८ शेतकरी १८ हेक्टर, बलवाडी ३२ शेतकरी २३ हेक्टर, थाेरगव्हाण ६ शेतकरी ५ हेक्टर, पुरी ४७ शेतकरी ४२ हेक्टर, गाेलवाडे १५ शेतकरी १३ हेक्टर असे एकूण रावेर तालुक्यातील २९ गावांतील ७०४ शेतकऱ्यांचे ६०२ हेक्टर क्षेत्रातील केळी पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
रावेर तालुक्यात वादळामुळे सात गावांतील ३४५ घरांची पडझड हाेऊन घरावरील पत्रे उडाल्याने नुकसान झाले. त्यात नुकसान झालेल्या घरांची संख्या गावनिहाय अशी : तांदलवाडी ३००, सिंगत २३, बलवाडी १०, अटवाडे ५, सहस्त्रलिंग ४, मांगलवाडी २, खिराेदा प्र. यावल १ असे एकूण सात गावांतील ३४५ ग्रामस्थांचे नुकसान झाले. दरम्यान वस्तुनिष्ठ पंचनामे करण्यात येतील, अशी माहिती तहसीलदार बी. ए. कापसे, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे व प्रभारी तालुका कृषी अधिकारी साठे यांनी दिली आहे.