मुक्ताईनगर उमेदवारावर झालेल्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर “या” उमेदवारांना मिळणार शस्त्रधारी अंगरक्षक
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्यावर ५ नोव्हेंबर २०२४ मंगळवार रोजी बोदवड तालुक्यातील राजुर येथे प्रचार करीत असतांना दोन अज्ञातांनी गोळीबार केल्याने मुक्ताईनगर आणि जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रात खळबळ उडाली. त्याच पार्श्वभूमीवर दिनांक ५ नोव्हेंबर २०२४ रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांच्या समितीने जळगाव जिल्ह्यातील ४९ उमेदवारांना शस्त्रधारी रक्षक दिनांक ६ नोव्हेंबर २०२४ बुधवार पासुन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुक लढवित असलेल्या जळगाव जिल्ह्यातील ११ मतदारसंघातील ४९ उमेदवारांना निवडणुकीच्या काळासाठी शस्त्रधारी अंगरक्षकाची सुरक्षा पुरविण्याचा निर्णय जिल्हास्तरीय समितीने घेतला आहे हि सुरक्षा फक्त निवडणुकीच्या काळासाठी आहे भविष्यात पुन्हा सुरक्षा रक्षक देण्याचा निर्णय जिल्हास्तरीय समिती योग्य तो निर्णय घेणार असल्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी बोलतांना सांगितले.
याना पुरविली जाणार सुरक्षा
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर – अनिल मोरे, अनिल गंगतिरे, अँड.रोहिणी एकनाथ खडसे, अशोक जाधव, संजय ब्रम्हणे, अर्जुन पाटिल,ईश्वर सपकाळे, उमाकांत मराठे, रोहिणी कवडे, रोहिणी खडसे, रोहिणीताई खडसे, चंद्रकांतभाऊ पाटिल, चंद्रकांत पाटिल,जफर अली मकसुद, विनोद सोनवणे, सुरेश तायडे. रावेर– अमोल जावळे, धनंजय शिरीष चौधरी,अनिल चौधरी, दारा मोहम्मद चाळिसगाव – उन्मेश पाटिल, मंगेश चव्हाण पाचोरा – वैशाली सुर्यवंशी, सतिश बिऱ्हाडे,अमित तडवी, प्रताप हरी पाटिल, मांगो पगारे, अमोल शिंदे,अमोल शांताराम शिंदे, निळकंठ पाटिल, मनोहर ससाणे, दिलिप वाघ, वैशाली किरण सुर्यवंशी अमळनेर – शिरीष हिरालाल चौधरी,डॉ.अनिल शिंदे,जळगाव ग्रामीण – गुलाबराव देवकर,मुकुंदा रोटे जळगाव शहर – डॉ.अनुज पाटिल,जयश्री महाजन,शैलजा सुरवाडे, राजु मामा भोळे, कुलभुषण पाटिल ,जामनेर – दिलिप खोडपे, भुसावळ – डॉ.राजेश मानवतकर ,चोपडा – प्रा.चंद्रकांत सोनवणे,प्रभाकर सोनवणे,एरंडोल – डॉ.सतिश पाटिल,अमोल चिमणराव पाटिल, ए.टी.पाटिल या उमेदवारांना शस्त्रधारी अंगरक्षक पुरविणार आहे.