भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

यावल मध्ये होम अपलायन्सेयच्या नावाखाली महिलेस साडे ४ लाखांचा गंडा

यावल, मंडे टू मंडे वृत्तसेवा : शहरातील एका महिलेला दुकानात लागण्याऱ्या इलेक्ट्रिक व होम अपलायन्सेय वस्तू खरेदीच्या नावाखाली सुमारे ४ लाख ५० हजार रूपयांमध्ये फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी यावल पोलीसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर असे  की, यावल शहरात वास्तव्यास असलेल्या शुभांगी जुगल पाटील (वय-२५) रा. गवत बाजार मेनरोड यावल ह्या गृहिणी महिला आहे. दरम्यान त्यांनी रिमार्ट शॉपी कंपनी चे मालक विलास मोतीराम राठोड (वय-४५) रा. अंबेजोगाई रोड ता. रेणापूर जि. लातूर यांनी “999 ब्रॉण्ड बाजार” या नावाने रिटेल शॉपी इलेक्ट्रिक व होम अपलायन्सेस वस्तू विक्री करण्याकरीता शुभांगी पाटील यांच्याशी संपर्क केला. त्यानुसार महिलेने राठोड यांच्या सांगण्यावरून वेळोवेळी साडे चार लाख रूपये दिलेल्या बँक अकाऊंटमध्ये जमा केले. तरी देखील राठोड नामक व्यक्तीने कोणत्याची पध्दतीचा मोबदला दिलेला नाही. किंवा पैसे परत केले नाही.

दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने यावल पोलीसात धाव घेतली. महिलेच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विलास राठोड याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अजमल खान पठाण करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!