खारघर मुंबई येथे गुर्जर समाजाच्या नवीन वास्तूचे लोकार्पण
बलवाडी, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज. आशीष चौधरी | खारघर नवी मुंबई येथील “लेवे गुर्जर स्नेहवर्धक मंडळ समाज मंदिर” चा लोकार्पण सोहळा व सुवर्ण महोत्सवी वर्ष निम्मित स्मरणिका प्रकाशन सोहळा केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा ताई खडसे व प्रशांत ठाकूर आमदार (खारघर ) तसेच नंदूभाऊ महाजन तांदलवाडी,भागवत पाटील निंबोल,शांताराम पाटील चहार्डी,रामदास पाटील निंबोल,राजीव पाटील रावेर,राहुल पाटिल निंबोल,समस्त गुर्जर समाज बांधव तसेच परराज्यातुन आलेले समाज बांधव यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला .
गेल्या काही वर्षा पासून लेवे गुर्जर स्नेहवर्धक मंडळ मुंबई समितीच्या मेहनतीने व सर्व समाज बांधव यांनी केलेल्या दानशूर कार्यामुळे भव्य दिव्य अशा समाज मंदिर इमारतीचे चे स्वप्न पूर्ण झाले आहे. भविष्यात समाजातील कॅन्सर रुग्ण व इतर आजारी रुग्ण,तसेच विवीध शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्टीने अतिशय महत्वाचे ठरणार आहे. समाज मंदिर इमारती उभारणी मागे फुल वा फुलाची पाकळी स्वरूपात योगदान देणाऱ्या समस्त समाज बांधवांचे तसेच समस्त कार्यकारणी मंडळ, समाज ऋण म्हणून सढळ हाताने निधी देणाऱ्या दानशूर व्यक्ती नवीन वास्तुसाठी रात्रंदिवस जीवापाड मेहनत घेणारे निळू चौधरी मोठे वाघोदा व महेश महाजन अहिरवाडी यांचे समस्त लेवे गुर्जर समाज बांधवांनी मनापासून आभार व्यक्त केले आहे.