महाविद्यालयात आयकर विभागाची धडक तपासणी मोहीम, अधिकारी व कर्मचारी वर्गात खळबळ
जळगाव जिल्ह्यातील प्रकार
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जळगाव जिल्ह्यात नाशिक विभागाचे अतिरिक्त आयकर आयुक्त विद्या रतन किशोर यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय. जळगाव या महाविद्यालयात आयकर विभागाचे अधिकारी तपासणी साठी अचानक दाखल झाल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यां मध्ये मोठी खळबळ उडाली.
हे पथक टी डी एस तपासणी बाबत दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ गिरीश ठाकूर यांच्या दालनात पथकाने विविध बाबी संदर्भात तब्बल नऊ तास चौकशी केली. दीर्घ वेळ चाललेल्या या तपासणीत बांधकाम व्यवहारात शासकीय नियमानुसार
टीडीएस कपात झाले आहे का?याची तपसणी करण्यात आली. तसेच जळगाव जिल्ह्यातील चिंचोली येथे सुरू असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बंधकामा संदर्भात शासनाकडून प्राप्त निधी, खरेदी बिले, तसेच वैद्यकीय बिले, जमा खर्च याचा बारकाईने आढावा घेत शासकीय नियमांचे काही उल्लंघन झाले किंवा होत आहे का.याची तपासणी करण्यात आली.
चौकशीत तपासणीत काही आक्षेप घेण्या सारखे किंवा काही अनधिकृत गैव्यवहार सारखा प्रकार झाला आहे का? या बाबत कुठलीही अधिकृत माहिती मिळाली नसली तरी शासकीय निधीच्या वापराबाबत अनेक शंका कुशंका उपस्थित केल्या जात आहेत. अचानक दाखल होत आयकर अधिकाऱ्यांची सुमारे नऊ तास चाललेली तपासणी म्हणजे काहीतरी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या घटनेने अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.