राष्ट्रीय

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मध्ये वाढ, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

मुंबई,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | पेन्शनबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत अनेकदा वेतनवाढीच्या एक दिवस आधी निवृत्ती झाल्याने त्यांना त्या वेतनवाढीचा फायदा मिळत नव्हता. परंतु आता पेन्शन मध्ये वाढ होणार आहे. आता वेतनवाढीच्या एक दिव आधी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही वेतनवाढीचा फायदा होणार आहे. म्हणजे जर तुम्ही ३० जून किंवा ३१ डिसेंबर रोजी रिटायर होत असाल तर या कर्मचाऱ्यांनाही वेतनवाढीचा फायदा होणार आहे. या कर्मचाऱ्यांना नोटिनल (निवृत्तीनंतर एका दिवसाने मिळणारी वेतनवाढ नोशनल) म्हणजेच काल्पनिक वेतनवाढ दिली आहे. जेणेकरुन पेन्शन योग्यरित्या ठरवता येईल. सेवानिवृत्तींतरच्या सुरक्षेसाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे.

२००६ मध्ये सरकारने दरवर्षी १ जुलै रोजी एकसमान वेतनवाढीची तारीख निश्चित केली होती. १ जानेवारी आणि १ जुलै या दोन दिवशी वेतनवाढ होते. त्यामुळे या दिवसाच्या आधीचा दिवस म्हणजे ३० जून आणि ३१ डिसेंबर रोजी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही या वेतनवाढीचा फायदा होणार आहे.

सन २०१७ मध्ये एका प्रकरणात मद्रास उच्च न्यायलयाने एका निवृत्त कर्मचाऱ्याला नोटिनल म्हणजेच काल्पनिक वेतनवाढीचा लाभ दिला आहे. यानंतर आता ही वाढ सर्वासांठी लागू करण्यात आली आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने २० मे २०२५ रोजी एक ऑफिस मेमे जारी केली. त्यात सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा फायदा मिळेल.जर त्यांनी चांगल्या पद्धतीने सेवेत काम केले असेल तर त्यांना हा फायदा मिळणार आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. आतापर्यंत अनेकदा वेतनवाढीच्या एक दिवस आधी निवृत्ती झाल्याने त्यांना त्या वेतनवाढीचा फायदा मिळत नव्हता. परंतु आता तुम्हाला पेन्शमध्ये वाढ मिळणार आहे.सेवानिवृत्तींतरच्या सुरक्षेसाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे. आता वाढीव पगाराच्या आधारावर पेन्शची गणना केली जाईल. ही वाढ फक्त पेन्शनसाठी असणार आहे. इतर कोणत्याही लाभांसाठी ही वाढ असणार नाही.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!