भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावलरावेर

रावेर-यावल मतदारसंघातील मका खरेदीचे उद्दिष्ट वाढवा : आमदार अमोल जावळे

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | खरीप पणन हंगाम २०२४-२५ अंतर्गत रावेर-यावल विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मका खरेदीसंदर्भातील अडचणी लक्षात घेऊन आमदार अमोलभाऊ जावळे यांनी राज्याचे सहकार व पणन मंत्री जयकुमारजी रावल यांची भेट घेऊन मका खरेदीचे उद्दिष्ट तातडीने वाढविण्याची मागणी केली आहे.

सध्या शासनाच्या किमान आधारभूत किंमत (MSP) योजनेअंतर्गत मका खरेदी प्रक्रिया सुरू असून रावेर-यावल मतदारसंघात यावर्षी मका पिकाखालील क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांची नोंदणी संख्याही लक्षणीयरीत्या वाढली आहे.

आमदार जावळे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, खरेदी केंद्रांवरील मर्यादित कोटा व वेळापत्रकामुळे अनेक शेतकरी प्रतीक्षेत असून हमीभावापेक्षा कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना मका विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर रावेर-यावल विधानसभा क्षेत्रासाठी स्वतंत्रपणे वाढीव मका खरेदी उद्दिष्ट मंजूर करून खरेदी कालावधी वाढविणे तसेच नोंदणीकृत सर्व पात्र शेतकऱ्यांचा मका हमीभावाने खरेदी करण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आमदार अमोल जावळे यांनी व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!