सावदा नगरपालिका कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू
सावदा, ता. रावेर.मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l रावेर तालुक्यातील सावदा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दी. २९ ऑगस्ट पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. नगर परिषद संवर्ग कर्मचारी तसेच इतर कर्मचारी यांच्या समस्या खालीलप्रमाणे आहेत –
१. जुनी पेंशन योजना लागु करणे किंवा नवीन राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अंमलबजावणी करणे.
२. राज्य संवर्ग पदे सातवा वेतन आयोग अधिसुचनेत पदांचा समावेश करुन सेवार्थ नंबर मिळणे.
३. सहायक अनुदान एक महिना आगाऊ देणे, सातव्या वेतन आयोग फरक व मागील महागाई
फरक रक्कम मिळणे.
४. राज्य संवर्ग सर्वसाधारण बदल्यांमधील जाचक अटी वगळणे.
५. नगरपरिषद कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना १०, २०,३०, लागु करणे.
६. पदोन्नतीतील कोट्यातील रिक्त पद तात्काळ भरणे.
७. मुख्याधिकारी विभागीय स्पर्धा परिक्षा तात्काळ MPSC मार्फत घेणे.
८. सेवानिवृत्ती उपदान व रजा रोखीकरण शासनाकडे भरणे व स्थानिक कर्मचारी यांना निवृत्ती रक्कमांचे अनुदान मिळणे.
९. धारणाधिकार सह नियुक्ती व बदली पदस्थापना करणे.
नगरपरिषद/नगरपंचायतीमधील अधिकारी व कर्मचारी यांच्या मागण्या
१. वेतन शासन लेखा कोषागार मार्फत करण्यात यावे.
२. सहायक आयुक्त/मुख्याधिकारी गट-ब (राजपत्रित) पदासाठी ६०% जागा राज्य संवर्ग पदोन्नतीने करण्यात याव्यात. (पदोन्नती ३०% व विभागीय परिक्षा ३०%)
३. कर व प्रशासकीय, अग्निशमन आणि स्वच्छता निरीक्षक सेवा संवर्ग वेतन श्रेणी ४२००/ S-१३ करावी.
४. अभियांत्रिकी संवर्गातील अभियंता यांना इतर विभाग प्रमाणे पदनाम व वेतनश्रेणी लागु करावी.
५. संवर्ग सेवेतील श्रेणी-अ पदास गट-ब (राजपत्रित) दर्जा आणि श्रेणी-ब पदास गट-ब (अराजपत्रित) दर्जा मिळणे.
६. अ वर्ग नगरपरिषद CAFO पदावर संवर्ग सेवेतील लेखा अधिकारी नियुक्ती करावी.
७. पाणीपुरवठा, मलनिस्सारण व स्वच्छता संवर्ग यांची वाढीव पदे निर्माण करावी. ८. संगणक, अग्निशमन व विद्युत या संवर्गाची पदे नगरपंचायतींमध्ये निर्माण करावी.
९. क वर्ग नगर परिषदांना उपमुख्याधीकारी हे पद निर्माण करावे.
१०. राज्य संवर्ग श्रेणी-क पदांवर २५% जागा स्थानिक कर्मचारी स्वतंत्र परिक्षा किंवा सेवा ज्येष्ठताने भरावी.
या साठी सावदा नगर परिषद येथील कर्मचारी यांनी आज दि.२९.८.२०२४ पासून बेमुदत संप सुरू झालेला आहे.सदरील संपामुळे सावदा व परिसरातील नागरिकांचे जन्म मृत्यू,मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ,मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ,तसेच नागरिकांच्या विविध प्रकारच्या सेवा वर विपरीत परिणाम झालेला आहे यास्तव नागरिकांना विविध सेवेसाठी नगर परिषद मध्ये हेलपाटे मारावे लागत आहे.