भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्रराजकीय

सुशांतसिंह राजपूतच्या मामांचे वक्तव्य : संजय राऊत खोटे बोलत आहेत !

मुंबई (वृत्तसंस्था)। अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या वडिलांनी दुसरे लग्न केले होते आणि सुशातला मान्य नव्हते असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातील ‘रोखठोक’ या सदरात म्हटले आहे. मात्र सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांनी दुसरे लग्न केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या वरून सुशांतसिंहचे मामा आर. सी सिंह यांनी राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. सुशांतच्या वडिलांनी दोन विवाह केलेले नसून संजय राऊत चुकीची माहिती देत आहेत, असे सिंह यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच खासदार संजय राऊत यांनी हे चुकीचे विधान केले आहे, असा आरोप सुशांतसिंहचे मामा आर. सी. सिंह यांनी म्हटले आहे. संजय राऊत अशी चुकीची माहिती देऊन आपची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा प्रकारे बोलून एखाद्याची प्रतिमा खराब करणे चांगली गोष्ट आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. बिहारमधील प्रत्येकजण हे जाणतो की सुशांतसिंह याच्या वडिलांनी केवळ एकच विवाह केलेला आहे, असेही ते म्हणाले. खासदार संजय राऊत आपल्या सामनामधील रोखठोक या सदरात लिहितात, ‘सुशांतसिंह राजपूत याचे कुटुंब म्हणजे त्याचे वडील पाटण्यात राहतात. त्याच्या वडिलांशी त्याचे चांगले संबंध नव्हते. वडिलांनी केलेले दुसरे लग्न सुशांतला मान्य नव्हते. त्यामुळे वडिलांशी त्याचे भावनिक नाते उरले नव्हते. याच वडिलांना फूस लावून बिहारमध्ये एफआयआर दाखल करायला लावला गेला आणि मुंबईत घडलेल्या गुन्ह्याचा तपास करायला बिहारचे पोलिस मुंबईला आले. याचे समर्थन होऊच शकत नाही. बिहारचे पोलिस म्हणजे इंटरपोल नव्हे’

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!