भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राजकीयराष्ट्रीयसामाजिक

मोठी बातमी! रविवारी 8.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 17 हजार कोटीं रुपये !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) रविवारी 1 लाख कोटी रुपयांच्या अ‍ॅग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड सुविधेची सुरुवात करणार आहेत. यावेळी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेनुसार  (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Scheme) देशातल्या साडे आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2 हजार रुपये टाकण्यात येणार आहेत. या योजनेतला हा सहावा हफ्ता आहे. यात रविवारी (9 ऑगस्ट ) शेतकऱ्यांना 17 हजार कोटींचं वाटप करण्यात येणार आहेत. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.

या योजनेंतर्गत आत्तापर्यंत 10 कोटी 31 लाख 71 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 75,000 कोटी रुपये टाकण्यात आले आहेत. या योजनेची सुरुवात 1 डिसेंबर 2018 ला झाली होती. लॉकडाऊनच्या काळात योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा करण्यात आली  होती. अ‍ॅग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड ला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या योजनेनुसार शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी देशात पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्याच बरोबर शेतकऱ्यांना कर्जाची सुविधा देण्यावरही भर देण्यात येणार आहे. यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज देखील करू शकता. जर अर्ज तुम्ही केला असल्यास त्याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी PM-KISAN चा हेल्पलाइन नंबर 011-24300606 वर संपर्क करू शकता.

जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला आहे आणि योजनेच्या यादीत तुमचं नाव आहे का हे तुम्हाला तपासायचे आहे, तर आता हे काम देखील ऑनलाइन शक्य आहे, -pmkisan.gov.in या वेबसाईटवर तुम्ही पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे तपासू शकता. -याकरता शेतकऱ्यांना pmkisan.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. त्यानंतर त्याठिकाणी दिसणाऱ्या ‘फार्मर कॉर्नर’ या टॅबवर क्लिक करा. याठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या नावाची या योजनेत नाव नोंदवण्यासाठी अर्ज करू शकता, त्याचप्रमाणे तुम्ही लाभार्थी असाल तर तुमची स्थिती देखील तपासून पाहू शकता. -‘फार्मर कॉर्नर’वर जाऊन ‘लाभार्थी सूची’ (लाभार्थी यादी) च्या लिंकवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, उप-जिल्हा आणि गावाची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर तुम्ही Get Report वर क्लिक केल्यास सर्व यादी मिळू शकेल.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!