आजपासून देशात एक मोठ्या अभियानाला सुरुवात : ‘नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन’ !
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहन पार पडल्यानंतर ते देशवासियांना संबोधल आहे. सलग सातव्यांदा पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरून देशासमोर आपलं म्हणणं मांडत आहेत.आजपासून देशात एक मोठ्या अभियानाला सुरुवात होतेय. हे आहे ‘नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन’… भारताच्या आरोग्य क्षेत्रात ही योजना मोठी क्रांती घेऊन येईल : पंतप्रधान मोदी
कोरोनाच्या साथीनं देशात थैमान घातलं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासीयांना एक दिलासा देणारी बातमी दिली आहे. ‘भारतात करोनावरील एक, दोन नाही तर तीन लसींची चाचणी सुरू आहे. लवकरच निर्मितीची प्रक्रियाही सुरू होईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. देशात आजपासून ‘नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन’ सुरू करण्याची घोषणाही मोदी यांनी यावेळी केली. या अंतर्गत देशातील सर्व नागरिकांना डिजिटल ‘हेल्थ आयडी’ दिला जाणार आहे. यात संबंधित व्यक्तीच्या आरोग्याची सर्व माहिती असेल. एखाद्या व्यक्तीवर किती चाचण्या झाल्या, त्याला कोणते आजार आहेत, कोणत्या डॉक्टरनं त्याला औषध दिलं, केव्हा दिलं. तपासणीचा अहवाल काय आहे, ही सगळी माहिती यात समाविष्ट असेल. हे डिजिटल हेल्थ मिशन देशाच्या आरोग्य क्षेत्रात नवी क्रांती ठरेल,’ असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.
कौशल्यवृद्धी म्हणजे आत्मनिर्भर भारत…आत्मनिर्भर म्हणजे आत्मविश्वास आहे. भारत अंतराळ क्षेत्रातही आत्मनिर्भर असल्याचे पंतप्रधान म्हणाले. आत्मनिर्भर कृषी आत्मनिर्भर शेतकरीचा उल्लेख यावेळी त्यांनी केला. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. बंधनातुन शेतकऱ्यांना मुक्त केलं असून शेतकरी कुठेही शेतमाल विकू शकतात असे ते म्हणाले. श्रमाला प्रतिष्ठा द्या. श्रमिकांनी स्वत:चा कौशल्य वाढवा असे आवाहनही त्यांनी केले. ६ लाखाहून अधिक गावांमध्ये हजारो लाखो किलोमीटर ऑप्टीकल फायबर नेटवर्कचे काम करण्यात येणार आहे. बदलत्या युगात सायबर स्पेसची गरज वाढलीय. अशावेळी सायबर सुरक्षा देखील खूप महत्वाची आहे. नवी सायबर सुरक्षा निती आणणार असल्याचे ते म्हणाले.