भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यनाशिकशैक्षणिक

मनसे विद्यार्थी सेना आणि महिला आघाडीच्या वतीने संदीप फौंडेशनच्या जखमी विद्यार्थ्यांना मिळाला न्याय

नाशिक, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l आज मनसे विद्यार्थी सेना आणि महिला आघाडी सेनेच्या वतीने संदीप फाऊंडेशन येथे काल मधमाशांचे मोहोळ पडून तेथील विद्यार्थ्यांना मधमाशांनी मोठ्या प्रमाणात चावा घेऊन संदीप फाऊंडेशनचे जवळपास 40 विद्यार्थी जखमी झाले त्यातील पंधरा-वीस जणांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले असता काही विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच मनसे विद्यार्थी व महिला सेनेने हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट दिली असता जखमी विद्यार्थ्यांचा खर्च त्यांच्या पालकांना करायला लावला होता मनसे विद्यार्थी सेना आणि महिला आघाडी ने हा विषय घेऊन संदीप फाऊंडेशन येथे जाऊन तेथील निकम सर यांना याबाबत जाब विचारला तसेच संदीप फाऊंडेशनने त्या विद्यार्थ्यांना फक्त हॉस्पिटलमध्ये दाखल केलं त्यानंतर त्यांची कोणत्याही प्रकारे काळजी घेतली नाही असे निदर्शनास आले हीच माहिती कॉलेज प्रशासनाला सांगितले असता त्यांनी त्या विद्यार्थ्यांचा दवाखान्याचा संपूर्ण खर्च कॉलेज करेल असे आम्हाला आश्वस्त करून दवाखान्यात फोन करून कोणत्याही विद्यार्थ्यांकडून त्याबाबत पैसे घेऊ नये असे सांगितले.

यावेळी विद्यार्थ्यांना सर्वांना मदत केली जाईल असे मनसे विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळाला सांगितले यामुळे मनसेने घेतलेल्या आंदोलनाला यश आले आणि सर्व पालकांनी त्याचे मनापासून मनसे विद्यार्थी सेना आणि महिला सेनेच्या शिष्टमंडळाचे अभिनंदन केले यावेळी मनसे नाशिक शहर संघटक वैभवराज रौंदळ, मनसे शहर संघटक रोहित उगावकर, मनसे महिला आघाडी शहर अध्यक्ष अक्षरा घोडके, अश्विनी बैरागी,मनसे विद्यार्थी सेनेचे प्रदेश कार्यकारणी शशिकांत चौधरी, बाजीराव मते ,शहराध्यक्ष ललित वाघ, ,उपजिल्हाध्यक्ष नितीन धानापुणे,दर्शन बोरसे आदी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!