भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

कामगार निरीक्षक ३६ हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

जळगाव, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l ३६ हजार रुपयांची लाच घेताना माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाचे  कामगार निरीक्षक चंद्रकांत पंडितराव पाटील. वय-५७, रा. वाघ नगर, जळगाव याना जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

तक्रारदार हे जळगाव शहरातील रहिवाशी असून ते माथाडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष तथा मुकादम म्हणून करत होते. तक्रारदार यांना मुकादम पदावरून स्थगिती देण्यात आली होती. याबाबत सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे सुनावणी सुरू आहे. दरम्यान या सुनावणीचा निकाल लावण्यासाठी कामगार निरीक्षक चंद्रकांत पाटील वय ५७ वर्ष.यांनी सदर सुनावणीचा निकाल सहाय्यक कामगार आयुक्त यांना सांगून लावून देतो असे सांगत तक्रारदार यांना ५० हजारांची लाचेची मागणी केली. शेवटी तडजोडी अंती ३६ हजार रुपये देण्याचे ठरले. परंतु तक्रारदारास लाच द्यायची नसल्याने तक्रारदार यांनी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे ५ ऑगस्ट रोजी तक्रार दिली होती.

या तक्रारीची पडताळणीसाठी गुरुवार ८ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता सापळा रचला. त्यावेळी कामगार निरीक्षक चंद्रकांत पाटील यांना ३६ हजारांची लाच घेतांना पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी चंद्रकांत पंडितराव पाटील. वय-५७, रा. वाघ नगर, जळगाव. यांच्या विरुध्द जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे यांच्या पथकाने केली

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!