सिनियर पोलिस इन्स्पेक्टरला ५० लाखांच्या लाच प्रकरणात अटक
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l विविध गुन्ह्यात गंभीर कलमे लावण्याची धमकी देऊन ५० लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी NRI सागरी पोलीस स्टेशनचे Sr. PI सतीश कदम यांना अँटिकरप्शन ब्युरो कडून अटक करण्यात आली आहे.
नवी मुंबईतील बेलापूर शहाबाज गावातील ईमारत दुर्घटना प्रकरणातील बिल्डर महेश कुंभार यांच्यावर विविध गुन्ह्यात अडकवून त्यांवर गंभीर कलमे लावण्याची धमकी Sr. Pi सतीश कदम यांनी दिली होती.
जर वरील प्रकरणातून वाचायचे असेल तर ५० लाखांची लाच si पी आय सतीश कदम यांनी बिल्डर महेश कुंभार याना मागितली होती. शेवटी १८ लाखा रुपये देणे ठरले.
ठरल्या प्रमाणे बिल्डर महेश कुंभार यांचा मुलगा अजय कुंभार याने १२ लाख २३ सप्टेंबरला आणि २७ सप्टेंबर रोजी २ लाख सतीश कदम यांना आधीच दिले होते. या संदर्भात कुंभार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्या नुसार ८ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० वा. सतीश कदम यांच्या उलवे येथील राहत्या घरी अजय कुंभार ४ लाख देण्यास गेला असता, ACB ने सतीश कदम यांना रंगेहाथ पकडत कारवाई केली आहे.