कृषी दिन व वसंतराव नाईक जयंती निमित्त थोरगव्हाण येथे प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन
गहुखेडा, ता. रावेर.मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | आज दी.01/07/25 रोजी कृषिदूतांनी घेतला पुढाकार; वृक्षारोपण, मार्गदर्शन आणि जनजागृती कार्यक्रम राबवले
थोरगव्हाण ता. रावेर जि. जळगाव. हरित क्रांतीचे जनक व माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त आणि कृषी दिनानिमित्त थोरगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथील अंतिम वर्षाच्या कृषिदूतांनी या उपक्रमाची संकल्पना मांडून यशस्वी अंमलबजावणी केली.
या कार्यक्रमात कृषिदूत दिनेश दिलीप महाजन, जयेश विठोबा माळी, पवन अरुण पाटील, प्रणव शंकर पाटील आणि शिवराज सदाशिव शेवाळे यांनी सहभाग घेत शालेय विद्यार्थ्यांना वसंतराव नाईक यांचे कार्य, कृषी दिनाचे महत्त्व आणि आधुनिक शेतीविषयक माहिती दिली. कार्यक्रमाचे मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे सर, प्रा. बी. एम. गोणशेटवाड सर आणि प्रा. व्ही. एस. पाटील सर यांनी केले.
यावेळी झाडे लावा, झाडे जगवा या घोषवाक्याला अनुसरून विद्यार्थ्यांसह वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत परिसरात विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. चित्रा तायडे मॅडम, उपशिक्षिका उज्वला नरेंद्र खैरनार मॅडम आणि मयूर प्रकाश पाटील सर यांची विशेष उपस्थिती लाभली.

