बहिणी ऐवजी १२ भावांनीच भरला बहिणींचा फोटो लावून लाडकी बहिण योजनेत स्वतः चा अर्ज
मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l राज्य सरकारने राज्यातील महिला आर्थिक सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. या योजनेची मुदत ३० ऑगस्ट पर्यंतच होती परंतु राज्यातल्या महायुती सरकारने याची मुदत सप्टेंबर अखेर पर्यंत वाढविण्यात आली आहे. पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये प्रमाणे पैसे मिळत आहेत. आजही अर्ज भरणे सुरू असून संभाजी नगर जिल्ह्यातून एक वेगळाच प्रकार उघडकीस आला आहे. संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात १२ व्यक्तींनी महिलांचे फोटो लावून स्वतः चा अर्ज भरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याआधी साताऱ्यातील जाधव नामक एका व्यक्तीनं वेगवेगळ्या आधार कार्डचा वापर करून पत्नीचे वेगवेगळ्या पोशाखातील फोटो लावून पत्नीच्या नावे तब्बल ३० अर्ज दाखल केल्याच उघडकीस आली आहे.इतकेच नव्हे तर त्या ३० पैकी २६ अर्ज मंजूर होऊन त्यांचे पैसेही खात्यात जमा झाले. या बाबत तक्रार दाखल आहे. ही ताजी घटना असताना कन्नडच्या महिला व बालकल्याण विभागाच्या निदर्शनास बहिणी ऐवजी १२ भावांनी अर्ज भरल्याचा प्रकार समोर आला.
कन्नडमधील त्या प्रकाराची चौकशी सुरु केली असून या १२ जणांव्यतीरिक्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आणखी काही पुरुषांनी अर्ज भरल्याचा अंदाज आहे. त्यामुळे सादर झालेल्या अर्जांची सखोल तपासणी करण्यात येत आहे.
आलेल्या अर्जांची पडताळणी केल्यानंतर हा भलताच प्रकार समोर आला. त्यात १२ भावांनी स्वतःच्या नावाने संबंधित पोर्टलवर अर्ज दाखल केले. आधार कार्डही स्वतःच्याच नावाचा अपलोड केला, तसेच हमीपत्रही स्वतःच्याच नावाने भरून दिला. पोर्टलवर फोटो मात्र अन्य महिलांचे अपलोड केल्याच समोर आले. दोषींवर कारवाई केली जाईल असे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे.