भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

केळी पिक नसताना केळी पिक दाखवून विमा काढला, तपासणीत अनेक बाबी उघड, रावेर तालुक्यातील प्रकार

रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्यभरात अनेक ठिकाणी केळी पीक नसताना केळी पिक दाखवून विमा काढून लाखो रुपये हडप केल्याचे प्रकार घडले. या प्रकरणांची चौकशी सुरू असून जळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या बोगस केळी पीक विमा तपासणीत अनेक प्रकारची अनियमितता आढळून आल्या आहेत.

त्या अनुषंगाने १० मार्चला रावेर येथे पाच सेंटरची समितीकडून तपासणी करण्यात आली. या तपासणीअंती रावेर येथील काही सीएससी (कॉमन सर्व्हिस सेंटर) मधून बाहेरील तालुक्यातील शेतकऱ्यांचे विम्याचे अर्ज भरल्याची बाब समोर येत आहे.

जिल्ह्यात ११,९०९ हेक्टरवर केळी पीक नाही, तर ४,५३५ हेक्टरवर जास्तीचा विमा काढल्याचे वरकरणी दिसत आहे.असा मोठा गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, चौकशीअंती अपात्र विमाधारकांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील ४८ सीएससी सेंटरमधून भरलेल्या अर्जाची चौकशी झाल्यावर ही स्पष्टता येईल. त्यात अधिकाऱ्यांनी सीएससी सेंटरवर ऐच्छिक अर्जाची तपासणी केल्यावर अनेक अर्जामध्ये जमिनीची माहिती व प्रत्यक्ष पीक स्थितीत तफावत आहे.

या योजनेमध्ये मागील वर्षाच्या विमा सहभागाच्या तुलनेत चालू वर्षी (२०२५-२६) जिल्ह्यात २५ टक्के विमा अर्ज सहभाग वाढला आहे. यासाठी शासन निर्णायानुसार आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे विमा कंपनीस ‘एमआरएसएसी’ मार्फत क्षेत्र तपासणीचे निर्देश कृषी आयुक्तांनी दिले होते.

सीएससी सेंटरमधून भरलेल्या अर्जाची तपासणी करण्यात येणार असून आवश्यकता वाटल्यास अधिकरी व विमा प्रतिनिधी हे गटावर संयुक्त जिओ टॅग करत तपासणी करतील. यामुळे बोगस विमा काढून शासनाला गंडवणाऱ्या टोळीचे पितळ पुरते उघडे पडणार आहे. यामुळे कारनाम्यात गुंतलेल्या संबंधित काही तलाठी,कृषी खात्याची संबंधित काही कर्मचारी,काही स्टँप वेंडर, ऑनलाइन काम करणारी यंत्रणा, विमा एजंट, अधिकारी, मध्यस्थी दलाल अशा अनेकांचे धाबे दणाणले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!