भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयआरोग्य

शास्त्रज्ञांचा धक्कादायक दावा! २०१२ मध्येच चीनमधील खाणीत वटवाघुळांमुळे कोरोना पसरला !

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)। संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोविड-१९ विषाणूचा फैलाव सात वर्षांपूर्वीच २०१२ मध्ये चीनमधील एका खाणीत झाला होता. या खाणीत वटवाघुळांची विष्ठा साफ करणारे सहा कामगार निमोनियासारख्या विषाणूमुळे बाधित झाले होते. त्यानंतर त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला होता, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. दरम्यान, या घटनेचेही वुहानमधील लॅबशी कनेक्शन असल्याचे सांगण्यात येत आहे.

तज्ज्ञांनी मिळवेल्या माहितीनुसार चीनमधील युन्नान प्रांतातील मोजियांग येथील खाणीत सहा कामगार अचानक आजारी पडले होते. हे कामगार खाणीतील वटवाघुळांची विष्ठा साफ करत असत. दरम्यान, या मजुरांवर उपचार करणारे डॉक्टर लू सू यांच्या निदर्शनास आले की, या रुग्णांना तीव्र ताप, सुका खोकला, हाता-पायाचे दुखणे आणि काही रुग्णांना डोकेदुखीचा त्रास होता. ही सर्व लक्षणे आता जगात पसरलेल्या कोविड-१९ ची आहेत. ही खाण वुहानपासून एक हजार किमी दूर आहे. मात्र तरीही येथील लॅबचा या प्रकणारशी संबंध होता. विषाणूतज्ज्ञ जोनाथन लॅथम आणि मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट अ‍ॅलिसन विल्सन बायोसायन्स रिसॉर्स प्रोजेक्टवर कामत करत आहेत. दरम्यान, त्यांनी ली शू यांचे याबबतचे शोधनिबंध वाचले होते. यामध्ये जे पुरावे देण्यात आले आहेत. त्यानंतर ते या साथीला नव्याने समजून घेत आहेत, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, या मजुरांचे सॅम्पल टिश्शू वुहानमधील लॅबमध्ये पाठवण्यात आले होते, आता तिथूनच हा विषाणू लीक झाला आहे, असा दावा जोनाथन यांनी न्यूयॉर्क टाइम्सशी केलेल्या चर्चेत केला आहे. तसेच याच लॅबमध्ये वटवाघुळांच्या मार्फत हा विषाणू पसरल्याचा शोध लागला होता, असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, कोरोना विषाणूचा फैलाव होऊ लागल्यापासूनच चीनमधील वुहान हे आरोपांच्या फेऱ्यात सापडले आहे. येथील प्राण्यांच्या बाजारातून हा विषाणू पसरल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच वुहानमधील व्हारयलॉजी लॅबमधून हा विषाणू लीक झाल्याचाही आरोप करण्यात येत आहे. मात्र हा विषाणू लोकांमध्ये पसरल्यानंतर सापडला होता आधी नाही, असा दावा या लॅबमधील अधिकारी आणि संशोधकांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!