भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयताज्या बातम्याराष्ट्रीय

International Yoga Day: कोरोनाला लढा देण्यासाठी योगासने आवश्यक – नरेंद्र मोदी

देशातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसत आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ४ लाखांचा टप्पा केला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आज योगा दिनानिमित्ताने ‘घरी योगा, कुटुंबासमवेत योगा’ याला प्रोत्साहन दिले जात आहे. जगभरात सहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत आहे. ‘कोरोनाशी लढण्यासाठी योगासने आवश्यक आहेत. त्यामुळे दैनंदिन आयुष्यात प्राणायम करा, असे आज योगा दिनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, ‘आपल्या श्वसन संस्थेवर कोरोना विषाणू हल्ला करतो. श्वसन संस्था अधिक चांगली करण्यासाठी योगाची मोठी मदत होते. याकरिता अनुलोम विनुलोम प्राणायम असून असंख्य प्रकार प्राणायमाचे आहेत. श्वसन संख्या मजबूत करण्यासाठी योगाची ही आसनं मदत करतात. त्यामुळे प्राणायमाला दैनंदिन आयुष्याचा प्रत्येकानं भाग बनवावं.’ यंदाचा आंतरराष्ट्रीय योगा दिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डिजिटल माध्यमातून साजरा करण्यात येत आहे. या संकटात मोठ्या संख्येने एकत्र येणे शक्य नसल्याने लोकांनी डिजिटल माध्यमातून योगा दिन साजरा करा, असे आवाहन केले जात आहे.

आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करताना म्हणाले की, योगातून कोरोनाबाधितांचा बाहेर पडण्याची ताकद मिळत आहे. योगामुळे मानसिक शांती, संयम आणि सहनशक्तीही मिळते. आंतरराष्ट्रीय योगा दिन एकजुटीचा दिवस असून विश्वबंधुतेचा संदेश देणार दिवस असतो. आपल्याला जोडतो आणि एकत्रित आणतो तो योग असतो. जगभरातील लोकांनी कोरोनाच्या संकटात माय लाईफ-माय योगा या व्हिडिओ ब्लॉगिंग स्पर्धेत ज्या प्रकारे सहभाग दर्शवला आहे, ते दाखवून देते की, आपल्याकडे योगाचा उत्साह वाढत आहे. यंदाचा योग दिन भावनात्मक योग दिन असून आपली कौटुंबिक एकता वाढवण्याचा दिवस आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!