शालेय पोषण आहारातून विद्यार्थ्यांना विषबाधा, ४० विद्यार्थी रुग्णालयात
मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l वविद्यार्थ्यांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारामधून विषबाधा झाल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला आहे. दुपारच्या जेवणात मटकीची आमटी आणि भात खाल्यानंतर मुलांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरु झाला. ही घटना ठाणे येथील कळव्यातील खासगी शाळा सहकार विद्यालयात घडली. विद्यार्थ्यांचे शारीरिक पोषण व्हावे म्हणून शासना कडून सकस पोषण आहार दिला जातो.
बचत गटाच्या माध्यमातून शासनाकडून सर्व सरकारी आणि खासगी शाळांमध्ये शालेय पोषण आहार दिला जातो. या शालेय पोषण आहारात मुखत्वे करून खिचडी दिली जाते. कळवा येथील मनिषा नगर दत्तवाडी सहकार विद्या प्रसारक मंडळात दुपारच्या जेवणात विद्यार्थ्यांना आहारात मटकीची आमटी आणि भात देण्यात आला होता. मात्र मटकीला वास येतं असल्याच्या तक्रारी मुलांनी केल्या. ही आमटी आणि भात खाल्ल्यानंतर मुलांना उलट्याचा त्रास सुरु झाला.
यानंतर लागलीच ३८ मुलांना तातडीने ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले.दाखल करण्यात आलेले विद्यार्थी हे पाचवी आणि सहावीचे विद्यार्थी असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
दरम्यान मुलांना देण्यात आलेली आमटीमधून मटकीचा वास येत असल्याने या संपूर्ण प्रकारानंतर पालक संतप्त झाले आहेत. शालेय पोषण आहार हे आधी शाळेच्या मुख्याध्यपकांनी खाणे अपेक्षित असतांना त्यांनी तसे न करता थेट विद्यार्थ्यांना दिल्याचा आरोपही या वेळी पालकांनी केला आहे.